Pune University Traffic
Pune University Trafficesakal

Pune University Traffic: विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आज पासून वाहतुकीत महत्त्वाचे बदल, जाणून घ्या मार्ग

शनिवारपासून (ता. १७) प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत.

पुणे, ता. १६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शनिवारपासून (ता. १७) प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी दिलेला उजवे वळण (राइट टर्न) आणि यू टर्न बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग-चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोरील मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठात इच्छित स्थळी जाता येईल.

(pune university traffic)

बाणेर आणि औंध रस्त्याने येणाऱ्या वाहनांना पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग-औंध रस्त्याने येणाऱ्या वाहनांनी पुणे विद्यापीठात जाण्यासाठी मिलेनियम गेटमधून प्रवेश करावा.

तसेच, बाणेर रस्त्यावरील वाहनांनी पुणे विद्यापीठासमोरील चौकातून डावीकडे वळून औंध रस्त्यावरील मिलेनियम गेटमधून प्रवेश करावा. याबाबत नागरिकांनी दोन मार्चपर्यंत पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, येरवडा येथील कार्यालयात लेखी सूचना पाठवाव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com