

जनमताच्या रेट्यामुळेच अखेर
मेट्रोमार्गाचे होणार उद्घाटन
काँग्रेस नेते मोहन जोशी यांचे मत
पुणे, ता. ३ : ‘वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्यासाठी रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोमार्ग लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने या मार्गावरील मेट्रोसेवा सुरू होत नव्हती. या विरोधात काँग्रेस पक्ष आणि ‘वेकअप पुणेकर’ संस्थेने जनमताचा रेटा उभा केला. त्यामुळेच अखेर येत्या बुधवारी (ता. ६) या मेट्रोमार्गाचे उद्घाटन होत आहे,’ असे मत काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
त्यांनी एक पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘पुणेकरांना शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग पूर्ण सुरु होणे आवश्यक आहे. मेट्रो लांब अंतरापर्यंत धावल्यास पुणेकर या सेवेचा लाभ घेतील. कोथरूडवरून पुणे रेल्वे स्थानकापर्यंत जाणाऱ्यांचीही सोय होईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा, रहदारीचा ताण कमी होईल. मात्र, ते लक्षात न घेता पंतप्रधानांच्या सोयीसाठी निम्म्याहून जास्त मेट्रो मार्ग रखडविला गेला होता. याच्या विरोधात पुणेकरांचा आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाने विविध प्रकारची आंदोलने केली. अलीकडेच समाजसेवक सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलनही करण्यात आले होते. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला होता. ‘वेकअप पुणेकर’ अभियानांतर्गत वाहतूक तज्ज्ञ आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यातून जनमताचा रेटा निर्माण झाला. त्यापुढे सत्ताधारी भाजपला झुकावे लागले. अखेर ऑनलाइन पद्धतीने का होईना मोदी बुधवारी उद्घाटन करणार आहेत.’
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.