हार्मोनिअमप्रमाणे ‘पांचजन्य वेणू’ बदलणार स्वरपट्टी
हार्मोनिअमप्रमाणे ‘पांचजन्य वेणू’ बदलणार स्वरपट्टीSakal

Pune : हार्मोनिअमप्रमाणे ‘पांचजन्य वेणू’ बदलणार स्वरपट्टी; ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांचे नवे संशोधन

गायनात साथ संगत करताना हार्मोनिअमची स्वरपट्टी बदलता येते, अगदी त्याप्रमाणे आता बासरी वादकालाही सुषिर वाद्यावर ‘स्वर पट्टी’ बदलणे शक्य होऊ शकणार आहे.

Pune News : गायनात साथ संगत करताना हार्मोनिअमची स्वरपट्टी बदलता येते, अगदी त्याप्रमाणे आता बासरी वादकालाही सुषिर वाद्यावर ‘स्वर पट्टी’ बदलणे शक्य होऊ शकणार आहे. प्लॅस्टिकचे पीव्हीसी पाइप आणि कार्बन फायबर अशा दोन घटकांचा उपयोग करून ही बासरी तयार केली आहे.

सर्वश्रुत असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाप्रमाणेच या बासरीची निर्मिती करण्यात आली आहे. ज्येष्ठ बासरीवादक डॉ. पं. केशव गिंडे यांनी या ‘पांचजन्य वेणू’ने सिद्ध बासरीचे संशोधन केले आहे.
संगीत क्षेत्रात गायनाबरोबरच हार्मोनिअम, तंतुवाद्यात विशेषतः सतार, सरोद आणि वीण या वाद्यांमध्ये स्वरपट्टी बदलता येण्याची सुविधा असते. परंतु आजपर्यंत स्वरांच्या पट्टीतील बदलांनुसार वादनासाठी अनेक बासऱ्या बदलाव्या लागतात.

परंतु ‘पांचजन्य वेणू’ या एकच बासरीद्वारे तीन ते चार स्वरांपर्यंत वादन करता येणार आहे. पं. गिंडे म्हणाले, ‘‘आतापर्यंत तीन स्वरपट्टीपर्यंत बासरी वादनाची व्याप्ती होती, परंतु या नव्या बासरीमुळे ही व्याप्ती वाढली आहे. स्वरांची उंची मिळविण्यासाठी ही रचना करण्यात आली आहे.

नवनिर्मिती पांचजन्य वेणूमुळे (बासरी) केवळ एकाच बासरीतून तीन ते चार स्वरांपर्यंत वादन करता येणे शक्य होणार आहे. या संशोधनाने बासरी वादकाला आता अनेक बासऱ्यांचा संच जवळ बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.’’ पं. गिंडे यांनी १९८४ मध्ये केशव वेणू बासरीची निर्मिती केली. आतापर्यंत केशव वेणूसह माधव वेणू, केशव नामवेणू, चैतन्य वेणू, अनाहत वेणू अशा नवीन बासऱ्यांची निर्मिती केली आहे.

बासरी वादन करताना हवामानाच्या बदलामुळे बासरीच्या स्वरात बदल होत असतो. मात्र, आता पांचजन्य वेणूच्या निर्मितीत प्लास्टिक आणि कार्बन फायबर वापरल्यामुळे स्वरांच्या पट्टीत हवामानाच्या बदलाचा काहीही परिणाम होत नाही. लवकरच या बासरीच्या निर्मितीचे पेटंट घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- पं. केशव गिंडे, ज्येष्ठ बासरीवादक

‘पांचजन्य वेणू’ची वैशिष्ट्ये

- बासरी एक ते सव्वा मीटर म्हणजे ४० ते ४५ इंच इतकी आहे
- बासरीची प्लॅस्टिकचे पीव्हीसी पाइप आणि कार्बन फायबरपासून निर्मिती
- स्वतंत्र तीन विभागांत विभागलेली बासरी
- प्रवासात सहज नेणे शक्य
- विविध स्वरांच्या वेणूंचा आविष्कार एकाच वेणूवर शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com