Vande Bharat
Vande Bharatsakal

Vande Bharat : ‘वंदे मेट्रो’ प्रवाशांच्या दिमतीला

वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता प्रवाशांच्या भेटीला वंदे मेट्रो येत आहे. मागच्या वर्षी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘वंदे मेट्रोची’ घोषणा केली होती. यानंतर प्रवाशांमध्ये ‘वंदे मेट्रो’विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

पुणे : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता प्रवाशांच्या भेटीला वंदे मेट्रो येत आहे. मागच्या वर्षी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘वंदे मेट्रोची’ घोषणा केली होती. यानंतर प्रवाशांमध्ये ‘वंदे मेट्रो’विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. चेन्नई येथील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) सध्या ‘वंदे मेट्रो’च्या प्रतिकृतीचे (प्रोटोटाइप) काम सुरू झाले आहे. ‘प्रोटोटाइप’ पूर्ण झाल्यावर लखनौ येथील रेल्वेच्या ‘आरडीएसओ’ या संस्थेत त्याची चाचणी होईल. त्यानंतर प्रत्यक्षात ‘वंदे मेट्रो’च्या उत्पादनास सुरुवात होईल. तोपर्यंत प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.

‘वंदे मेट्रो’ ही ‘वंदे भारत’सारखी दिसणारी ८ डब्यांची रेल्वे असणार आहे. ही रेल्वे १०० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या दोन शहरांना जोडणार आहे. थोडक्यात ज्या मार्गावर लोकल धावते, त्या मार्गावर येत्या काही वर्षांत ‘वंदे मेट्रो’ धावणार आहे. ‘वंदे मेट्रो’ सुरू झाल्यावर डेमू व मेमूसह ईएमयू (लोकल) हळूहळू कमी होतील.वंदे भारत मेट्रो सुरु झाल्यानंतर प्रवाशांसाठी सुविधा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

ही आहेत ‘वंदे मेट्रो’ची वैशिष्ट्ये

  • ‘वंदे मेट्रो’ १०० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या दोन शहरादरम्यान धावेल.

  • ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ही लांबच्या अंतरासाठी, तर ‘वंदे मेट्रो’ कमी अंतरासाठी धावेल. त्यामुळे ही ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे छोटे रूप असेल.

  • एका मार्गावर दिवसातून ७ ते ८ वेळा धावेल.

  • एका रेकमध्ये ८ डबे असतील.

  • ही रेल्वे वातानुकूलित असेल. वेगदेखील जास्त असेल. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

चेन्नईमध्ये प्रतिकृतीचे काम सुरू

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या धर्तीवर आता ‘वंदे मेट्रो’च्या कामाला काही अंशी सुरुवात झाली आहे. सध्या मेट्रोचे प्रोटोटाइपचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच चाचणी घेतली जाईल. त्यानंतरच प्रत्यक्षात ‘वंदे मेट्रो’च्या उत्पादनास सुरुवात होईल.

- जी. व्यंकटेशन, जनसंपर्क अधिकारी, आयसीएफ, चेन्नई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com