11 th Admission
11 th Admissionsakal

11 th Admission : कोट्यांतर्गत निम्म्याहून अधिक जागा रिक्त

अकरावी प्रवेशाबाबत राज्यातील स्थिती; केवळ ३५ ते ४० टक्केच प्रवेश... इयत्ता अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशात व्यवस्थापन, अल्पसंख्याक, इनहाउस अशा विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शून्य ते शेवटच्या फेरीपर्यंत संधी दिली जाते. परंतु कोट्यांतर्गत प्रवेशात निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहत असल्याची बाब समोर येत आहे.

पुणे : इयत्ता अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशात व्यवस्थापन, अल्पसंख्याक, इनहाउस अशा विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शून्य ते शेवटच्या फेरीपर्यंत संधी दिली जाते. परंतु कोट्यांतर्गत प्रवेशात निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहत असल्याची बाब समोर येत आहे. म्हणूनच आता विद्यार्थ्यांचे प्रवेश गुणवत्तेवर आधारितच व्हावे आणि विविध प्रकारच्या कोट्यांतर्गत प्रवेश नियमित प्रवेश फेऱ्यापूर्वी राबविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

व्यवस्था सुधारणा मोहीम (सिस्कॉम) यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ दरम्यान राबविलेल्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विविध कोट्यांंतर्गत प्रवेशाचा तपशील माहिती अधिकारात मागविण्यात आला. त्यात, विविध कोट्यांंतर्गत १०० टक्के जागा भरल्या जात नसल्याचे दिसून आले.

या प्रक्रियेत एकूण प्रवेशक्षमतेच्या कोट्यातील प्रवेशासह केवळ ७० टक्के जागा भरल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये १०० टक्के प्रवेश झालेल्या विभाग आणि माध्यमांची संख्या १० टक्केदेखील नाही. याउलट शून्य ते २० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या विभाग आणि माध्यमांची संख्या ३० ते ३५ टक्के आहे. यामध्ये अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा देखील समावेश आहे. शून्य ते २० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात बरेचसे विभाग हे ‘एचएसव्हीसी’चे आहेत.

व्यवस्थापन स्तरावरील कोट्यात उपलब्ध जागांपैकी सरासरी ५० टक्के, इनहाउस कोटा ३५ ते ४० टक्के, अल्पसंख्याक कोटा ३५ ते ४० टक्के जागा भरल्या आहेत. उर्वरित जागा रिक्त राहत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विविध कोट्यांंतर्गत प्रवेश हे नियमित प्रवेशापूर्वी राबविण्यात यावे आणि गुणवत्तेनुसार प्रवेशात संधी मिळावी, अशी मागणी ‘सिस्कॉम’च्या वतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालये सोडल्यास अन्य कोणत्याही महाविद्यालयातील १०० टक्के जागा भरल्या जात नाहीत. त्याप्रमाणे अल्पसंख्याक, व्यवस्थापन, इनहाउस अशा विविध कोट्यांंतर्गत जागा पूर्णपणे भरल्या जात नसल्याचे वास्तव आहे. बहुतांश नामांकित महाविद्यालये व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश नाकारतात आणि त्या जागा प्रत्यार्पित करतात, तसेच पालकांनाही विद्यार्थ्यांचे प्रवेश व्यवस्थापन कोट्यातून घेणे शक्य होत नसल्याने ते नियमित प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. दरम्यान, भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल.

- प्रसाद कालगावकर, सहाय्यक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com