Weather Update
Weather Updatesakal

Weather Update : अर्ध्या महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट''

पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात बुधवारी (ता. २३) वादळीवारे, ढगांच्या गडगडटासाह पावसाच्या सरी पडतील, असा ‘यलो अलर्ट'' हवामान खात्याने मंगळवारी दिला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर बुधवार उष्ण दिवस ठरेल, असा इशाराही खात्याने दिला आहे.

पुणे : पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात बुधवारी (ता. २३) वादळीवारे, ढगांच्या गडगडटासाह पावसाच्या सरी पडतील, असा ‘यलो अलर्ट'' हवामान खात्याने मंगळवारी दिला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर बुधवार उष्ण दिवस ठरेल, असा इशाराही खात्याने दिला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका वाढला होता. राज्यात पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक म्हणजे ४२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल मालेगाव येथे ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषम हवामान राज्याच्या काही भागांत अनुभवायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान कमी-जास्त होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह बुधवारी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

वादळी पावसाच्या शक्यतेचे कारण
दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३९.६, धुळे ४१, जळगाव ४०.८, महाबळेश्‍वर ३२.४, मालेगाव ४१.८, नाशिक ३८.२, सांगली ३८.२, सातारा ३८.४, सोलापूर ३९.८, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३४.५, रत्नागिरी ३४.६, छत्रपती संभाजीनगर ३८.५, परभणी ३९.१, अकोला ३९.२, अमरावती ३७.८, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ४०.८, चंद्रपूर ३९, गोंदिया ३६, नागपूर ३७.८, वर्धा ३९, यवतमाळ ३८.५.

चौकट ः
उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com