कोल्हापुरी, सोलापुरी मिसळची लज्ज्त

कोल्हापुरी, सोलापुरी मिसळची लज्ज्त

पुणे, ता. २६ : कोल्हापुरातील पाणी पुण्यात आणून तयार केलेली कोल्हापुरी मिसळ, चुलीवरची सोलापुरी मिसळ आणि आंबट, गोड, तिखट मिश्र चवीची पुणेरी मिसळ अशा विविध प्रकारच्या मिसळ एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. अशा या ‘सकाळ मिसळ उत्सवा’चे उद्‍घाटन शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण उमाप यांच्या हस्ते झाले. हा उत्सव शनिवार (ता. २७) आणि रविवार(ता. २८)पर्यंत आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या मिसळ उत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी अक्कुदास ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विलास कासुर्डे, राज मसालेचे संचालक प्रीतम खाबिया उपस्थित होते. मिसळ उत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची सकाळी नऊपासून गर्दी झाली होती.

उपवासाची मिसळ मिळणार
मिसळ उत्सवात बेडेकर मिसळ, खान्देश मिसळ, शारदानंद मिसळ, केदार मिसळ, भगरे मिसळ, नाद खुळा मिसळ, करवीर कट्टा, बावडा मिसळ, गावरान मिसळ आदी ब्रॅंड्स आहेत. तसेच परिघा फूड्स, आप्पा फिल्टर कॉफी, चुलीवरची दही मिसळ, तसेच मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर वृंदावन आइस्क्रीमचाही आस्वाद घेता येईल. शनिवारी (ता. २७) संकष्टी चतुर्थी आहे. त्यानिमित्ताने उपवासाचीही मिसळ मिळणार आहे.

मिसळीचे विविध प्रकार
कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, सोलापूर मिसळ, दही मिसळ, नाद खुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ आणि त्याहून अधिक प्रकारच्या मिसळ यात आहेत. राज मसाले आणि अक्कुदास ट्रेडिंग हे या उत्सवाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत, तर केळकर हाउसिंग हे रिअल इस्टेट आणि ऑटो पार्टनर ‘नमः शिवाय हीरो’ हे आहेत. मिसळ उत्सवासाठी सर्वांना सशुल्क प्रवेश आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’चे उपक्रम समाजाला जोडणारे असतात. त्याप्रमाणेच ‘सकाळ मिसळ उत्सव’ खवय्यांसाठी चांगले खाण्याच्या उद्देशाने आयोजित केला आहे. घरी स्वयंपाक करताना स्वच्छता बाळगतो, त्याप्रमाणे स्टॉलवरही असायला हवी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे परवाना पाहिजे. स्वयंपाक करणाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पिझ्झा बर्गरपेक्षा मिसळ अधिक पौष्टिक आहे.
- प्रवीण उमाप,
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

मी मूळची कोल्हापूरची आहे. गेली १५ वर्षे पुण्यात स्थायिक झाले आहे. मिसळ हा प्रकार मला खूप आवडतो. त्यामुळे सहकुटुंब मिसळ उत्सवात कोल्हापूरची मिसळ खाण्यासाठी आलो आहोत.
- शमा देसाई, नागरिक

व्यवसायातील ही आमची तिसरी पिढी असून, बेडेकर मिसळला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुणेकरांना आवडणारी गोड, आंबट व तिखट अशा मिश्र चवीची परिपूर्ण मिसळ उपलब्ध आहे. त्यामुळे मिसळप्रेमींना ती आवडते. तसेच खरवस, सोलकढी, कॉफी आदी पदार्थही आहेत. बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी किंवा नातेवाइकांना देण्यासाठी ‘रेडी टू इट’ मिसळचे बॉक्सही आहेत.
- आदित्य बेडेकर, बेडेकर मिसळ

बावडा मिसळला १०१ वर्षे पूर्ण झाली असून, आमची चौथी पिढी या व्यवसायात आहे. अस्सल कोल्हापुरी चवीची मिसळ पुणेकरांसाठी यानिमित्त उपलब्ध केली आहे. कोल्हापुरातून पाणी आणले असून, त्याचा वापर करून मिसळ तयार केली आहे. त्यामुळे अस्सल कोल्हापुरी चवीचा आस्वाद मिसळप्रेमींना मिळत आहे.
- रत्नदीप चव्हाण, बावडा मिसळ

सकाळ मिसळ उत्सव
कधी- २७ आणि २८ एप्रिल

कुठे- बोगनवेल फार्म, डी. पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ, पुणे
वेळ- सकाळी ९ ते रात्री ९
सुविधा- मोफत पार्किंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com