‘सीएमए’चे योगदान महत्त्वपूर्ण

‘सीएमए’चे योगदान महत्त्वपूर्ण

पुणे, ता. २६ : ‘‘देशातील विकासकामे करदात्यांच्या पैशांतून होत असतात. त्यामुळे कोणताही प्रकल्प राबविताना त्याचे सूक्ष्म आर्थिक नियोजन आणि प्रस्तावित खर्चाचा योग्य विनियोग कसा होईल यावर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) काम करत असतो. विकसित भारताच्या वाटचालीत ‘सीएमए’चे योगदान महत्त्वपूर्ण आहे,’’ असे मत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल आणि आयसीएमएआय पुणे चॅप्टरच्या वतीने ‘रिजनल प्रॅक्टिशनर्स कॉन्व्हेंशन २०२४’ आणि ‘रिजनल लेडी सीएमए कॉन्व्हेंशन २०२४’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. या वेळी ‘आयसीएमएआय’चे अध्यक्ष अश्‍विन दलवाडी, केंद्रीय समितीचे सदस्य नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष चैतन्य मोहरीर, सचिव मिहीर व्यास, खजिनदार नॅन्टी शहा, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष नागेश भागणे, डॉ. डी. व्ही. जोशी आदी उपस्थित होते.
दलवाडी म्हणाले, ‘‘संसदेच्या कायद्यांतर्गत स्थापित झालेली आयसीएमएआय ही एक ‘प्रोफेशनल’ संस्था आहे. कॉस्ट अकाउंटन्सीच्या व्यवसायाचा प्रचार, नियमन आणि विकास करण्याचे काम होते. तर सीएमए हे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्स, कॉस्ट ऑडिट अँड सर्टिफिकेशन व ऑडिट ऑफ कॉस्ट रेकॉर्डसच्या क्षेत्रात कार्यरत असतात.’’ कार्यक्रमात डॉ. जोशी यांचे बीजभाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश भागणे यांनी, तर सूत्रसंचालन नीलेश केकाण यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com