शरीराचे जितके वजन तितक्याच
ग्रॅमची प्रथिने आवश्यक ः डॉ. रानडे

शरीराचे जितके वजन तितक्याच ग्रॅमची प्रथिने आवश्यक ः डॉ. रानडे

पुणे, ता. २७ ः ‘‘भारताच्या प्राचीन काळापासून पशुवैद्यकीयशास्त्राला महत्त्व आहे. दूध, मांस, अंडी या प्राणिजन्य पदार्थांना उत्तम आरोग्यासाठी सेवन करणे आवश्यक आहे. ‘मांस’ व ‘अंडी’ याविषयी नागरिकांमध्ये खूप गैरसमज आहेत. ते दूर होणे आवश्यक आहेत. चांगल्या आरोग्यासाठी जितके शरीराचे वजन आहे, तेवढ्याच ग्रॅम प्रथिनांची शरीराला आवश्यकता आहे,’’ असे मत डॉ. अजित रानडे यांनी व्यक्त केले.
वेट्स इन पोल्ट्री यांच्या वतीने जागतिक पशुवैद्यकीय दिनाचे औचित्य साधून शनिवारी पत्रकार संघात ‘चिकन व अंडी यांचे आहारातील महत्त्व, त्याविषयी असलेले गैरसमज’ या विषयावर डॉ. अजित रानडे यांनी मार्गदर्शन केले. रानडे म्हणाले, ‘‘अंडी व चिकन यांच्याविषयी नागरिकांमध्ये खूप गैरसमज आहेत. यात अंडी मांसाहारी आहेत, ती खूप उष्ण असतात, रोज खाऊ नयेत. मात्र हे खोटे असून, प्रथिनांसाठी अंडी व चिकन रोज खाणे हे शरीरासाठी उत्तम आहे. एका अंड्यातून सहा ग्रॅम तर चिकनमधून २१ टक्के प्रथिने मिळतात. दिवसाला किमान चार अंडी खायला हवीत, असेही आवाहन त्यांनी केले. आहारतज्ज्ञ शीतल मुद्‌गल म्हणाल्या, ‘‘रोगांचा नायनाट करण्यासाठी अंडी खाणे आवश्यक आहे. शरीरात सुमारे ६०० प्रकारचे मसल्स आहेत. त्यांना प्रथिनांची खूप आवश्यकता असते. अंडी व चिकनमधून प्रथिनांची गरज भागवली जाऊ शकते. अंडी हे पूर्ण अन्न आहे. स्मार्ट जीवनशैलीमध्ये अंडी व चिकन यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’ डॉ. प्रसन्ना पेडगावकर, वेट्स इन पोल्ट्रीचे अध्यक्ष डॉ. अजय देशपांडे, सचिव डॉ. संतोष इरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com