Pune Weather Update : पुणे कमाल तापले; कोरेगाव पार्क ४३.३, तळेगाव ढमढेरे ४३.४ अंशांवर

Pune Temperature: पुण्यातील शिवाजीनगर येथे यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचा रविवारी उच्चांक झाला. शहरात ४१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
Pune highest Temperature
Pune highest Temperatureesakal
Published on

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथे यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचा रविवारी उच्चांक झाला. शहरात ४१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तळेगाव ढमढेरे येथे ४३.४ आणि कोरेगाव पार्क येथे ४३.३ कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे शनिवारी वर्तविण्यात आला.

Pune highest Temperature
Pune Traffic Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल, बदलले मार्ग आणि वेळ जाणून घ्या एका क्लिकवर

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका लागत होता. दुपारी ११ वाजल्यानंतर उन्हाच्या चटक्याची तीव्रता वाढली. दुपारी चारपर्यंत उन्हाचा भयंकर चटका जाणवत होता. रविवार सुटीच्या दिवशी रस्त्यावर वाहतूक कमी होती.

पण, इतर रविवारी जाणवणारी तुरळक गर्दीची दुपारी १२ ते तीन या वेळेत जाणवत नव्हती. कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी टोपी, गॉगल घातला होता. पूर्ण चेहरा झाकून घेऊन दुचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी दिसत होते.

Pune highest Temperature
Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

रस्त्यावर ठिकठिकाणी शीतपेये विक्रेत्यांच्या दुकानावर नागरिकांनी गर्दी केल्याचेही चित्र शहरात रविवारी दिसले. पुणे शहरात यंदाच्या उन्हाळ्यात गुरुवारी (ता. १८) आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.

अवघ्या दहा दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस पडल्याने कमाल तापमान शनिवारपर्यंत (ता. २०) ३७.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तापमानाचा पारा वाढून आता ४० अंश सेल्सिअसच्या वर उसळी मारली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील कमाल तापमान चाळिशी पार जाण्याचा आजचा पाचवा दिवस ठरला.

Pune highest Temperature
Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

शहरात गेल्या वर्षी फक्त एक दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यापूर्वी म्हणजे २०२२ मध्ये सात दिवस कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. त्या वर्षी २८ एप्रिलला ४१.८ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदले होते. त्यानंतर बरोबर दोन वर्षांमधला रविवारी दुसरा उच्चांक नोंदला गेला.

उन्हाचा चटका वाढणार

पुणे शहरात पुढील दोन दिवसांमध्ये सोमवारी (ता. २९) कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदले जाईल. तर, त्यानंतर एप्रिलच्या शेवटी मंगळवारी (ता. ३०) आणि मेच्या सुरुवातीला बुधवारी (ता. १) ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढेल. त्यानंतर दोन ते चार मे या दरम्यान आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने कमाल तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनो या आठवड्यात उन्हाच्या वेळा सोडून घराबाहेर पडा.

असा वाढला कमाल तापमानाचा पारा (अंश सेल्सिअसमध्ये)
२४ एप्रिल ............ ३८.५
२५ ......................... २९.४
२६ ......................... ४०.३
२७ ......................... ३०.९
२८ ......................... ३१.३

चटका वाढण्याची कारणे


१. प्रतिचक्रवातामुळे गुजरातवरून गरम वारे महाराष्ट्राच्या दिशेने वहात आहेत. कोकणात त्याचा सर्वाधिक प्रभाव आहे. तसेच, पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानात त्यामुळे वाढ झाली आहे.
२. पुण्यात फारसा पाऊस पडला नसल्याने माती कोरडी आहे. त्यामुळे जमिनीकडून उष्णता मोठ्या प्रमाणात शोषून घेतली जात आहे. तसेच, त्यातून परावर्तित होत आहेत.
३. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या प्रवाह असलेल्या एल निनो हा घटकमुळेही यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. त्याचाही परिणाम पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये होत असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com