अर्भकांसाठी अमूलचे रेडी टू फीड द्रवपदार्थ

अर्भकांसाठी अमूलचे
रेडी टू फीड द्रवपदार्थ
Published on: 

नवी दिल्ली, ता. १७ : ‘अमूल’ने भारतामध्ये प्रथमच नवजात अर्भकांसाठी रेडी टू फीड (आरटीएफ) द्रवपदार्थ किटाणूरहित पॅकमध्ये सादर केला आहे. या पॅकच्या टोकाला झाकण असल्याने द्रवपदार्थ ओतून घेणे सोपे जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या पॅकमुळे अर्भकांसाठी पदार्थ बनवण्यातील वेळ वाचणार असून, ते दिवसातून अनेकदा वापरता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, अर्भकाला प्रत्येक वेळी योग्य प्रमाणात पौष्टिक घटक मिळणार असून, बाळ कृश किंवा अतिवजनाचे होण्याचा धोका टळणार आहे. हे पॅक प्रवासात सोबत बाळगणे सोपे असेल व त्यातून स्वच्छतेच्या समस्या निर्माण होणार नाहीत. हे पॅक नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अधिक उपयुक्त असून, ते सर्व मेडिकल स्टोअर्स, अमूल पार्लर व ऑनलाइन साइटवर उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.