Agman gate of old terminal of Pune airport closed 15 check in counters
Agman gate of old terminal of Pune airport closed 15 check in counters SAkal

Pune : प्रवाशांसाठी १५ अतिरिक्त काउंटर; जुन्या टर्मिनलच्या ‘आगमन’ गेटच्या जागेत ‘चेक इन’ सुविधा

प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचे ‘आगमन’ गेट बंद करून त्या जागेत १५ ‘चेक इन काउंटर’ सुरू करण्यात येणार आहे.

प्रसाद कानडे

Pune News : प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचे ‘आगमन’ गेट बंद करून त्या जागेत १५ ‘चेक इन काउंटर’ सुरू करण्यात येणार आहे. नवीन टर्मिनल सुरू होताच जुने टर्मिनल प्रवाशांसाठी बंद होईल. त्यानंतर ‘चेक इन काउंटर’चे काम सुरू होणार आहे. तसेच याच इमारतीत प्रवाशांसाठी वरच्या बाजूस ‘सेक्युरिटी होल्डींग एरिया’ देखील तयार केला जाणार असल्याची माहिती विमानतळावरील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून काही दिवसांतच विमानांची वाहतूक सुरू होणार आहे. नवीन टर्मिनल प्रवासी सेवेत दाखल झाल्यावर जुने टर्मिनल प्रवाशांसाठी बंद केले जाणार आहे. जुने टर्मिनल बंद होताच विविध कामांना सुरुवात होणार आहे. काही दिवसांतच समर शेड्यूल सुरू होणार असल्याने नवीन कामांचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

‘चेक इन काउंटर’ची संख्या ४९ होणार

विमानतळावर दाखल होताच प्रवाशांना आपल्या बोर्डिंग पाससाठी ‘चेक इन काउंटर’वर जावे लागते. त्यामुळे प्रवाशांची येथे सतत गर्दी असते. नवीन टर्मिनलवर प्रशासनाने ३४ ‘चेक इन काउंटर’ उपलब्ध केले आहेत. प्रवासी संख्येच्या तुलनेत ही संख्या कमी ठरत असल्याने प्रवाशांसाठी हे गैरसोयीचे ठरले असते.

मात्र विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी ‘चेक इन काउंटर’ची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. जुन्या टर्मिनलच्या ‘आगमन’ गेटच्या जागेत १५ ‘चेक इन काउंटर’ बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील ‘चेक इन काउंटर’ची संख्या तब्बल ४९ इतकी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा रांगेतला वेळ कमी होण्यास मदत मिळेल.


विमानतळावरील विविध कार्यालये पाडणार
विमानतळाच्या ‘निर्गमन’ गेटसमोर विविध कंपन्यांचे तिकीट केंद्र आहेत. तसेच पास विभाग, ‘सीआयएसएफ’चे कार्यालय आहे. ही सर्व कार्यालये लवकरच दुसऱ्या जागेत स्थलांतरीत होत आहे. हे स्थलांतर झाल्यावर ‘निर्गमन’ गेट समोरचे बांधकाम पाडण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळाचा आतील परिसर मोकळा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com