Pune Cyber Crime News
Pune Cyber Crime Newssakal

Pune Cyber Crime News : सायबर चोरट्यांकडून उच्चशिक्षितांना टार्गेट

ऑनलाइन टास्कसह विविध आमिषांना सायबर चोरट्यांनी चौघांची एकूण ४५ लाख १० हजार ३०० रुपयांची फसवणूक केली. सायबर चोरटे उच्च शिक्षितांना टार्गेट करत असून, कमी वेळेत चांगला परतावा देण्याच्या आमिषाने असे प्रकार करण्यात येत आहे.

पुणे : ऑनलाइन टास्कसह विविध आमिषांना सायबर चोरट्यांनी चौघांची एकूण ४५ लाख १० हजार ३०० रुपयांची फसवणूक केली. सायबर चोरटे उच्च शिक्षितांना टार्गेट करत असून, कमी वेळेत चांगला परतावा देण्याच्या आमिषाने असे प्रकार करण्यात येत आहे. सायबर चोरट्यांनी टास्कच्या आमिषाने कोथरूड येथील एकाची ३२ लाख १३७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.

या प्रकरणी जिजाऊनगर कोथरूड येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ेेेेेेेेेेेेेेेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून संपर्क केला. यानंतर वेगवेगळे टास्क करायला लावून त्याबदल्यात चांगला मोबदला देऊ, असे सांगून वेगवेगळ्या बँकेत पैसे पाठवायला सांगून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले.

वडगाव बुद्रूकमधील ४० वर्षीय व्यक्तीची टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तीन लाख ५६ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली आहे. कोंढवा येथील४७ वर्षीयी व्यक्तीची आयपीओमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन लाख ८९ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील करत आहेत.

Pune Cyber Crime News
Pune Crime News : म्हाळुंगेतील एका तरुणाचे अपहरण

दिल्लीतील विमानतळावर कस्टम विभागात अडकविल्याचे सांगत हडपसर भागात राहणाऱ्या एकाची २ लाख ६४ हजार ३९६ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादींशी सोशल मीडियावर मैत्री केली. यानंतर दिल्ली विमानतळावर कस्टम विभागात अडकलो असून, तेथून सुटका करण्यासाठी भारतीय चलन भरावयाचे असल्याचे सांगून पैसे पाठवायला सांगून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com