Murlidhar Mohol, Sakal, Pune Lok Sabha
Murlidhar MoholMurlidhar Mohol Facebook

माझं पुणं देशातील सर्वोत्तम शहर करणार - मुरलीधर मोहोळ

मोहोळ यांनी पुढील पाच वर्षांत पुण्यासाठी काय करणार?, या संदर्भात ‘सकाळ’शी संवाद साधला

पुणे : ‘‘मेट्रोच्या जाळ्याचे विस्तारीकरण, सांडपाणी प्रक्रिया करून नदी शुद्ध करणे,पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणे, पुण्याला इंडस्ट्रिअल हब बनवणे, त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावून पुणेकरांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न असणार आहे. ‘माझं पुणं देशातील सर्वोत्तम शहर’ हे माझे व्हीजन आहे. हा माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुणेकर मला नक्कीच साथ देतील’’, असा विश्वास भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

Murlidhar Mohol, Sakal, Pune Lok Sabha
Voter Slips : दोन लाख पुणेकरांनी घेतल्या मतदार स्लिपा; मुरलीधर मोहोळ यांच्या यंत्रणेचा नागरिकांना फायदा

मोहोळ यांनी पुढील पाच वर्षांत पुण्यासाठी काय करणार?, या संदर्भात ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला अनेक प्रकल्प दिलेले आहेत. पूर्वीच्या काळी काँग्रेस सरकारमध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर उद्‍घाटन होण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागत होती. पण आता मोदी यांनी पुण्यातील मेट्रोचे भूमिपूजन केले आणि त्याचे उद्‍घाटनही केलेले आहे. मुळा-मुठा नदी शुद्ध करण्यासाठी सरकारकडून हजार कोटीचा निधी मिळाला, त्याचे काम प्रगतिपथावर आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामे शहरांमध्ये केली आहेत. समान पाणीपुरवठा योजनेतून शहरातील पाणी वितरणाची यंत्रणा सक्षम केली जात आहे. यामुळे तीन ते चार टीएमसी पाण्याची बचत होईल, पुढील २० वर्ष तरी शहराला पाणी कमी पडणार नाही, अशी व्यवस्था आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे मुळशी धरणातून पुण्यासाठी स्वतंत्र कोटा मंजूर करून घेऊन ते पाणी पुण्यात आणले जाईल. या १० वर्षांच्या काळामध्ये पंतप्रधान मोदी यांनी पुण्यासाठी कायम सहकार्य केले आहे. आगामी काळातही पुण्यात विकासाची गंगा वाहण्यासाठी मोदी यांचे नेतृत्व देशात आवश्यक आहे.’’ 

आगामी ५० वर्षांचा विचार
पुणे शहर झपाट्याने वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या ६० लाख असून महापालिकेचे हद्द ५१८ चौरस किलोमीटर इतकी मोठी झालेली आहे. शहर वाढताना आगामी ५० वर्षांचा विचार करून प्रकल्प राबवत आहोत. नगर रस्त्यावरून थेट शिक्रापूरपर्यंत सहा पदरी उड्डाणपूल बांधला जाणार आहे. चांदणी चौकातील उड्डाणपूल बांधल्यामुळे पश्चिम पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या आम्ही सोडवली आहे. मेट्रोचा विस्तार करत आहोत. यामध्ये खडकवासला ते हडपसर-खराडी, शिवाजीनगर ते हडपसर-फुरसुंगी,  शिवाजीनगर-हिंजवडी, पौड रस्ता ते माणिक बाग, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते कात्रज असे मेट्रोचे जाळे शहरात काही वर्षात विस्तारणार आहे. 

जुन्या वाडयांचा प्रश्न मार्गी लावणार
पुरातत्त्व विभागाच्या तरतुदी अंतर्गत वारसा वास्तूंच्या (अ गट) १०० मीटर परिघातील वाडे आणि जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न संसदेच्या पटलावर ठोसपणे मांडून, त्यावर मार्ग काढला जाईल. लोहगाव विमानतळ परिसरातील संरक्षण विभागाने निर्बंध घातले आहेत. त्याचा अभ्यास करून ते शिथिल व्हावेत, यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. पुण्यात नवे प्रकल्प आणणे, केंद्र सरकारशी संबंधित विभागाचे प्रश्न सोडविण्यास गती मिळावी यासाठी पुण्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असणे आवश्यक आहे.

पुणेकर मोदींचे काम जाणतात
भाजपने पुण्यासाठी काय केले?, अशी टीका विरोधक करत असले तरी त्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. नरेंद्र मोदी आणि भाजपने पुण्यासाठी काय केले आहे, हे पुणेकर व्यवस्थितपणे जाणून आहेत. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा हजारो पुणेकरांना थेट लाभ झालेला आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे दूरदृष्टी व इच्छाशक्ती नसल्याने पुण्यातले प्रश्न गंभीर झाले आहेत. वाहतूक कोंडी, असमान पाणी वाटप हे काही गेल्या पाच वर्षांतील प्रश्न नाहीत तर काँग्रेसने वेळीच लक्ष न दिल्यामुळे या समस्या गंभीर झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून १५०० बसेस पीएमपीसाठी खरेदी केलेल्या आहेत. महत्त्वाच्या रस्त्यावर उड्डाणपूल बांधून नागरिकांना कोंडीतून मोकळे केले आहे. काही प्रकल्प पूर्ण करताना थोडासा वेळ लागतो; पण त्यातून पुणेकरांचे हितच आम्ही बघितलेले आहे. शासकीय कामे करताना यात काही विषय महापालिकेच्या स्तरावरचे असतात, काही राज्य सरकारच्या तर काही केंद्र सरकारच्या स्तरावरचे असतात. या तिन्ही स्तरावर समन्वय साधून कामे गतीने करून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

Murlidhar Mohol, Sakal, Pune Lok Sabha
Pune Lok Sabha Election : मतदारयादीतील नाव सापडत नाहीय ? ऑनलाइन पद्धतीने शोधणे सहज सोपे


शहराच्या विकासासाठी थिंकटँक
पुणे शहरामध्ये टॅलेंट खचाखच भरलेले आहे. त्याचा शहराच्या विकासासाठी उपयोग करून घेता येणे आवश्यक आहे. सामाजिक क्षेत्र, आर्थिक, उद्योग, शिक्षण, आरोग्य, वाहतूक नियोजन, पर्यावरण सर्व क्षेत्रातील अनेक मंडळी पुण्यामध्ये आहेत. सर्वच गोष्टी लोकप्रतिनिधीला कळतात असे नाही. त्यामुळे या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून त्यांचे सल्ले घेऊन शहराचा विकास करण्यासाठी ‘थिंक टॅंक’ तयार केला जाणार आहे. त्यांच्याशी वारंवार चर्चा केली जाईल. त्याचप्रमाणे मी महापौर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जनसंवाद’ करायचो. त्याच पद्धतीने खासदार झाल्यानंतरही ‘संवाद’ ठेवला जाईल. जो काम करतो त्याच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढत असतात, ते सहाजिकच आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. शहराचा खासदार हा सर्वांसाठी उपलब्ध असला पाहिजे. त्याची थेट एक्सेस असला पाहिजे, अशी नागरिकांच्या अपेक्षा असते. सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहणारा कार्यकर्ता असल्याने पुणेकरांची हा अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com