मुलाऐवजी घेतले आईचेच रक्त

मुलाऐवजी घेतले आईचेच रक्त

पुणे, ता. ५ : कल्याणीनगर अपघातात प्रकरणातील अल्पवयीन मोटारचालकाऐवजी घेतलेले रक्त त्याच्या आर्इचे असल्याचे ‘डीएनए’ अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुलाच्या आईचा डीएनए तपासणीचा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा (एफएसएल) अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यातून ही बाब उघडकीस आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याबाबत दाखल गुन्ह्यात आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. अपघाताचा गुन्हा घडल्यावर ससून रुग्णालयात मुलाला नेण्यात आले. त्याचा रक्ताचा नमुनाही घेण्यात आला. परंतु, त्यावेळी मुलाऐवजी आईच्या रक्ताचे नमुने मद्याची मात्रा तपासण्यासाठी दिले होते, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांना सांगितले. तपासणीसाठी दिलेले रक्त महिलेचे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. पुढे तपासामध्ये मुलाऐवजी त्याच्या आईचे रक्त दिल्याचे तांत्रिक पुराव्यावरून व तिच्याकडे केलेल्या चौकशीवरून समोर आले होते. आता मुलाच्या आईच्या रक्ताचा डीएनए अहवाल प्राप्त झाला. डॉक्टरांनी घेतलेले रक्त आईचे असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com