बालगंधर्वमध्ये आज रंगणार ‘नमन नटवरा’

बालगंधर्वमध्ये आज रंगणार ‘नमन नटवरा’

संगीत रंगभूमीवरील नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित ‘नमन नटवरा’ या नाटकाची निर्मिती गोव्यातील भूमिका थिएटर या संस्थेने केली आहे. योगायोग म्हणजे, या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरातच होत आहे. आज शनिवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजता हा प्रयोग सादर होत आहे. यापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक गाजले होते. या नाटकाचे लेखन दत्ताराम कामत बांबोळकर यांनी केले आहे, तर सुशांत नायक यांनी दिग्दर्शन केले आहे. बालगंधर्वांची भूमिका अमोघ बुडकुले यांनी साकारली असून अनुजा पुरोहित यांनी लक्ष्मी यांची आणि ममता शिरोडकर यांनी गौहर यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह अजित केरकर यांनी हरीभाऊंची भूमिका केली आहे. बालगंधर्व यांच्यावर आधारित नाटक असल्याने यात त्यांची सुमधुर नाट्यगीते आणि ऑर्गनचे सूर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com