एमआयटी एडीटीत रक्तदान शिबिर

एमआयटी एडीटीत
रक्तदान शिबिर

पुणे, ता. १८ ः एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १५८ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
शिबिराचे उद्‍घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते, तर कुलसचिव डॉ. महेश चोपडे, सहाय्यक कुलसचिव डॉ. विशांत चेमटे, मॅनेटचे प्राचार्य प्रेरित मिश्रा, डॉ. श्रीकांत गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विशाल पाटील, प्रा. हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी विद्यापीठ आवारात प्रत्येकी २० किलो अन्न कचऱ्यापासून २,५०० लिटर बायोगॅस क्षमता असणाऱ्या तीन युनिट्सचे उद्‍घाटन करण्यात आले. आता या कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दररोज पाच तास शेगडी चालू शकेल इतका गॅस तयार होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com