‘एपस्टीन फाईल’मध्ये आजी-माजी तीन खासदार

‘एपस्टीन फाईल’मध्ये आजी-माजी तीन खासदार

Published on

पुणे, ता. १६ : ‘‘अमेरिकेतील उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमुळे देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. गोपनीय कागदपत्रे १९ डिसेंबरपर्यंत समोर येतील. त्यामध्ये भारतातील तीन आजी-माजी खासदारांचा समावेश आहे,’’ असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ कदाचित याच दबावामुळे थांबविले असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल्या वार्तालापात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘अमेरिकेच्या सिनेटने या प्रकरणातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषणासारखे गुन्हे दाखल होते. तुरुंगात असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये अनेक राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यात भारतातील तीन आजी-माजी खासदारांचा समावेश असून, ही कागदपत्रे खुली झाल्यावर त्याचे गंभीर पडसाद देशातील राजकारणात उमटून पंतप्रधानपदी बदल होऊ शकतो.’’
‘‘मतदारयादी स्वच्छ ठेवणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असून, सत्ताधारी भाजपच्या फायद्यासाठी आयोग मतदारयादी सुधारत नाही. एकेकाळचा स्वायत्त निवडणूक आयोग आता सरकारचा झाला आहे. राज्य सरकार शेतकरी आत्महत्या, रोजगार यावर काहीच ठोस उपाययोजना करत नाही. केवळ रस्ते तयार करण्यातच धन्यता मानत आहे,’’ अशी टीकाही चव्हाण यांनी केली. सूत्रसंचालन सागर आव्हाड यांनी केले.

चव्हाण म्हणाले...
- लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जनतेने भरभरून पाठिंबा दिला
- राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनतेच्या मतांच्या आधारे अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले
- विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी दुबार-तिबार मतदान झाले
- राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार पंतप्रधान थांबवू शकतात
- आम्ही युवकांना जोडून घेण्यास आणि नागरिकांचे ज्वलंत विषय पुढे आणण्यात कमी पडलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com