

भैरवगड येथे भूस्खलनग्रस्तांचे बेमुदत उपोषण
सातारा, ता. ५ : भैरवगड (टोळेवाडी) येथील भूस्खलनग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळावीत, या मागणीसाठी भूस्खलनग्रस्तांनी आजपासून गावातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शासनाचा अध्यादेश येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंदर्भात टोळेवाडी (भैरवगड) पुनर्विकास संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की पाच ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या भूस्खलनानंतर बाधित कुटुंबे गेली सात वर्षे कायमस्वरूपी निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. एक जुलै २०२२ रोजी शासनाने पुनर्वसनास मान्यता दिली होती. मात्र, याबाबत प्रशासकीय कार्यवाहीतील दिरंगाई, वारंवार त्रुटी काढणे आणि फाईल प्रक्रिया रखडल्यामुळे आजपर्यंत प्रत्यक्ष पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे भूस्खलनग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सातत्याने पाठपुरावा, बैठका व निवेदने देऊनही कोणताही निर्णय झाला नाही. कायमस्वरूपी घर नसल्याने भूस्खलनग्रस्त कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पुनर्वसनासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून अधिकृत अध्यादेश प्राप्त होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय भूस्खलनग्रस्तांनी व्यक्त केला आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून, तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी भूस्खलनग्रस्तांनी केली आहे.
.........................
40277
भैरवगड (टोळेवाडी) : येथील भूस्खलनग्रस्तांनी गावातच बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.