बिबट्याच्या हल्यात बारा वर्षीय बालक ठार

बिबट्याच्या हल्यात बारा वर्षीय बालक ठार

ओतूर, ता. १६ : येथील जाकमाथा येथील वाक वस्ती येथे बिबट्याच्या हल्यात बारा वर्षीय बालक ठार झाल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.
हि घटना रविवारी रात्री नऊच्या दरम्यान झाली असून यात संजीव जमेरीया (वय १२, मुळ रा.सेंदवा राज्य मध्यप्रदेश सध्या रा.ओतूर,वाकमळा) असे आहे.
ओतूर येथील जाकमाथा येथील वाक परिसरात ताजणे यांच्या शेतात मध्यप्रदेश येथील शेतमजूर राहण्यास होते. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान झोपडी बाहेर भावा बरोबर खेळत असताना अचानक बिबट्याने झडप घेऊन झोपडी पासून अडीचशे ते तीनशे फूट लांब झाडीत ओढून नेले. तसेच अर्धवट खाऊन परीसरातील तरुणांनी आरडा ओरड केल्याने बिबट पळून गेला.
ओतूर येथील जाकमाथा व वाक परिसरात वनविभागाने मोक्का पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी माजी जि.प.सदस्य तुषार थोरात, ग्रामपंचायत सदस्य राजेश वाकर, संतोष गीते, नंदकुमार डोके, संदेश थोरात यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com