एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्रोपचारासाठी येणाऱ्यांना मोठा फायदा
डॉ. रोकडे ः एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
उंड्री, ता. 23 ः काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, अपवर्तक त्रुटी, क्रॉस आय, कॉर्नियल रोग इत्यादी डोळ्यांची स्थिती ओळखण्याचे आणि तपासण्याच्या प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. प्रकाश रोकडे यांनी केले.
महंमदवाडी येथील एच. व्ही. देसाई नेत्र हॉस्पिटलमध्ये इंग्लंडमधील वर्ल्ड साइट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी चीफ मेडिकल डायरेक्टर डॉ. राहुल देशपांडे, डॉ. सुचेता कुलकर्णी, डॉ. कुलदीप डोळे उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये सरकारी आणि अशासकीय क्षेत्रातील प्राथमिक नेत्रसेविकांनी सहभाग नोंदवला. ३० प्राथमिक नेत्र उपचार कार्य करणाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी डॉ. अँथनी चिग्नेल आणि ४ डॉक्टरांच्या टीमने विशेष कार्यशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया यांनी प्रास्ताविक केले.


उंड्री, ता. 2६ः काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी,अपवर्तक त्रुटी, क्रॉस आय, कॉर्नियल रोग इत्यादी डोळ्यांची स्थिती ओळखण्याचे आणि तपासण्याच्या प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. प्रकाश रोकडे यांनी केले.
महंमदवाडी येथील एच. व्ही. देसाई नेत्र हॉस्पिटलमध्ये इंग्लंडमधील वर्ल्ड साइट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी चीफ मेडिकल डायरेक्टर डॉ. राहुल देशपांडे, डॉ. सुचेता कुलकर्णी, डॉ. कुलदीप डोळे उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये सरकारी आणि अशासकीय क्षेत्रातील प्राथमिक नेत्रसेविकांनी सहभाग नोंदवला. डॉ. अँथनी चिग्नेल आणि ४ डॉक्टरांच्या टीमने विशेष कार्यशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com