मोटारीच्या धडकेने रिक्षाचालक जखमी

मोटारीच्या धडकेने रिक्षाचालक जखमी

खडकवासला, ता. २५ : पुणे-पानशेत रस्त्यावर खडकवासला गावाच्या हद्दीत डीआयएटी परिसरात रिक्षा आणि मोटारीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात रिक्षाचालक देविदास भांगरे (रा. डोणजे) जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. रिक्षा पुण्याहून डोणजे गावाकडे जात होती. तर मोटार पुण्याच्या दिशेने वेगाने येत होती. मोटारीने रिक्षाला समोरून धडक दिल्यामुळे रिक्षा उलटली. स्थानिक नागरिकांनी जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. अपघातानंतर मोटारचालक आणि इतर प्रवासी पलायन करीत असताना त्यातील एकास नागरिकांनी पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com