मार्केट यार्डात आज मूक मोर्चा

मार्केट यार्डात आज मूक मोर्चा

मार्केट यार्ड, ता. १६ : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेमधील बेकायदा लिंबू विक्रेत्यांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या विरोधात दाखल झालेला ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा रद्द व्हावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १७) काळे कपडे घालून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच मूकमोर्चा काढून सर्व संघटनांच्या वतीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्याला निवदेन देण्यात येणार आहे.
याबाबतची बैठक रविवारी मार्केट यार्डातील जय शारदा गणेश मंदिरात पार पडली. यामध्ये गुरुवारी (ता. २०) बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध (बापू) भोसले यांनी दिली. यावेळी अडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले, ज्येष्ठ अडते गणेश घुले, अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, सचिव करण जाधव, उपाध्यक्ष सौरभ कुंजीर, युवराज काची, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, अडते असोसिएशनचे संचालक रोहन जाधव, आप्पा कोरपे उपस्थित होते.

काय आहे प्रकरण?
- बाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता अतिक्रमण करून, लिंबाची विक्री सुरू
- लिंबू विक्रीमुळे बाजार आवारात वाहतूक कोंडी
- याच्या विरोधात अतिक्रमण निर्मुलन मोहीम बाजार समिती प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने राबविली
- मात्र ही मोहीम राबविताना कोणताही गुन्हा दाखल झाला नाही
- सहा महिन्यांनंतर दाखल झालेला गुन्हा हा अन्यायकारक असल्याची बाजार समिती अधिकारी, कर्मचारी, बाजार घटकांची भूमिका
- दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

गुरुवारी (ता. २०) बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे अडते असोसिएशनच्या बैठकीत ठरले आहे. गुन्हा रद्द व्हावा या मागणीसाठी सोमवारी (ता. १७) काळे कपडे घालून निषेध करण्यात येणार आहे. मूकमोर्चा काढून सर्व संघटनांच्या वतीने पोलिस ठाण्याला निवदेन देण्यात येणार आहे.
- अनिरुद्ध (बापू) भोसले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com