फ्लॉवर, कोबी, मटारच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ

फ्लॉवर, कोबी, मटारच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ

मार्केट यार्ड, ता. ३१ : बाजारात रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होती. मागणी जास्त असल्याने फ्लॉवर, कोबी, मटारच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. इतर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांचे भाव टिकून होते.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्यासह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्याच्या परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची १२ टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून चार टेम्पो शेवगा, राजस्थानमधून १५ टेम्पो गाजर, कर्नाटकातून घेवडा पाच टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग शेंगा दोन टेम्पो, मध्य प्रदेशातून मटार २५ ट्रक, कर्नाटकातून पावटा तीन टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची पाच टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ७०० गोणी, भेंडी सहा टेम्पो, गवार सहा टेम्पो, टोमॅटो १२ हजार क्रेट, हिरवी मिरची पाच टेम्पो, काकडी १० टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी पाच टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, पावटा पाच टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, कांदा जुना आणि नवीन १०० ट्रक, इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ७० टेम्पो आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव- कांदा - नवीन : १६०-२००, बटाटा : १२०-१८०, लसूण : १४००-२२००, आले सातारी : ७००-७५०, भेंडी : ६००-७००, गवार : गावरान ६००-८००, सुरती : ६००-८००, टोमॅटो : १५०-२५०, दोडका : ५००-६००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : ३००-३५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी ५००-६००, पांढरी : ४००-५००, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-३००, फ्लॉवर : २००-२५०, कोबी : १२०-१६०, वांगी : ४००-६००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ५००-५५०, तोंडली : कळी : ५००-६००, जाड : ३००-३२०, शेवगा : ६००-८००, गाजर : २००-२५०, वालवर : ४५०-५००, बीट : १६०-१८०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-३००, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ७००-७५०, मटार : २८०-३६०, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

शेपू, चुका, हरभरा गड्डीच्या भावात वाढ
पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने शेपू, चुका, हरभरा गड्डीच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. इतर सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर होते. रविवारी कोथिंबिरीची तब्बल दीड लाख जुडी, तर मेथीची ७० हजार जुडी इतकी आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १०००-१६००, शेपू : ८००-१५००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-७००, पुदिना : ४००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ६००-१२००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-१००, चवळई : ३००-७००, पालक : ८००-१५००, हरभरा गड्डी : ८००-१५००.

खरबूज, सीताफळांच्या भावात वाढ
फळबाजारात रविवारी खरबूज आणि सीताफळांच्या भावात वाढ झाली असून, लिंबांचे भाव कमी झाले. अननस, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कलिंगड, स्ट्रॉबेरी, पपई, चिक्कू, पेरू आणि बोरांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्डमध्ये रविवारी केरळ येथून अननस पाच ट्रक, मोसंबी ५५ टन, संत्रा ५५ टन, डाळिंब ३० टन, पपई २० टेम्पो, लिंबांची साडेचार हजार गोणी, कलिंगड पाच टेम्पो, खरबूज १० टेम्पो, सीताफळ ३० टन, चिक्कू दोन हजार बॉक्स आणि बोरांची १७०० गोणी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : १००-३००, अननस (१ डझन) : १००-६००, मोसंबी : (३ डझन) : १७०-३२०, (४ डझन) : १००-१७०, संत्रा : (१० किलो) : २५०-६००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ४०-१३०, गणेश : १०-३०, आरक्ता : १०-५०, कलिंगड : १०-१६, खरबूज : १२-२५, पपई : ५-१५, चिक्कू (१० किलो) : १००-५००, सीताफळ (एक किलो) : २०-६०, पेरू (२० किलो) : ३००-५००, बोरे (१० किलो) चमेली : १८०-२२०, उमराण : ७०-१००, चेकटन : ६५०-७००, चण्यामण्या : १०००-१२००.


झेंडूच्या भावात निम्म्याने घट
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत झेंडूच्या भावात निम्म्याने घट झाली. अन्य फुलांच्याही भावात काही प्रमाणात घट झाली असून, शेवंतीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १००-१५०, अ‍ॅस्टर : जुडी २०-२५, सुट्टा : ८०-१२०, कापरी : ३०-६०, शेवंती : ८०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ८०-२००, जरबेरा : ४०-६०, कार्नेशियन : १००-२००, शेवंती काडी : १५०-३००, लिलीयम (१० काड्या) : ९००-१०००, ऑर्चिड : ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : २००-२५०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com