मिरचीची लाली उतरली

मिरचीची लाली उतरली

मार्केट यार्ड, दि. १९ : मागील दोन वर्षांपासून लाल मिरचीने भाववाढीचा उच्चांक गाठला होता. परंतु यंदा देशभरात लागवड आणि उत्पादन जास्त आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्व प्रकारच्या लाल मिरचीच्या भावात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे.
देशात सर्वांत आधी मध्यप्रदेशातील लाल मिरचीचे पीक निघते. यंदा तेथे लाल मिरचीचे पीक चांगले आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोअरेजमध्ये मालाचा स्टॉक करतात. यंदा कोल्डस्टोअरेजमध्येदेखील माल आहे. उत्पादन क्षेत्रात मसाला कारखानदारांकडून मागणी असली तरी उत्पन्न जास्त आहे. त्यामुळे भावात घट झाल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.
दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की महिला मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. एप्रिल, मे महिन्याच्या दरम्यान शेतीची कामे आटोपतात. या काळात महिला वर्षभरासाठी लागणारा मसाला, लाल तिखट, पापड, खारोड्या, कुरडया तयार करतात. यंदा लाल मिरचीची आवक जानेवारीपासूनच सुरू झाली असून सध्या भावही आवाक्यात आहेत.

भाव घटण्याची प्रमुख कारणे
- देशभरात लाल मिरचीची लागवड जास्त
- पाऊस आणि पोषक वातावरणामुळे उत्पन्न जास्त
- यंदा निर्यातीचे प्रमाण घटले
- काही राज्यांत कोल्ड स्टोअरेजमध्ये माल शिल्लक

या राज्यात सर्वाधिक उत्पन्न
मध्यप्रदेश
आंध्र प्रदेश
कर्नाटक
तेलंगण
गुजरात
तमिळनाडू
महाराष्ट्र
पंजाब
आसाम
राजस्थान


सलग दोन वर्षे लाल मिरचीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी जास्त लागवड केली. त्यामुळे भावात घट झाली आहे. महाराष्ट्रात खान्देशात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. भारतात आंध्रप्रदेश, तेलंगण येथे तिखट मिरची, कर्नाटकमध्ये कमी तिखट मिरचीचे उत्पादन घेतले जाते.
- वालचंद संचेती, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‌स चेंबर


देशातील मिरची उत्पादनापैकी ७० टक्के मिरची देशांतर्गत वापरली जाते, तर ३० टक्के निर्यात केली जाते. भारतातून निर्यात होणाऱ्या सर्व मसाल्यांमध्ये सुक्या मिरचीची निर्यात सर्वांत जास्त होते. राज्यात नागपूर, पुणे, वाशी, सांगली, नगर आणि नंदुरबार मार्केटमध्ये मिरचीची सर्वाधिक उलाढाल होते. पुण्यातील मसाला प्रक्रिया उद्योगांकडून तसेच मसाला विक्रेते, कोकण, सातारा व पुणे जिल्ह्यांतून मिरचीला सर्वाधिक मागणी असते.

या देशांत होते निर्यात
चीन
थायलंड
बांगलादेश
अमेरिका
ब्रिटन
जर्मनी
व्हिएतनाम
सौदी अरेबिया
श्रीलंका
नेदरलॅंड
जपान
स्वीडन
कॅनडा
इराण
ऑस्ट्रेलिया
इटली

कर्नाटक बेडगीला जागतिक मागणी
कर्नाटक राज्यात पिकणाऱ्या बेडगी मिरचीच्या रंग आणि तिखटपणामुळे या मिरचीला जागतिक बाजारात मोठी मागणी आहे.

घाऊक बाजारातील किलोचे भाव
प्रकार एप्रिल २०२३ एप्रिल २०२४
कश्मिरी ढब्बी ६०० ते ७०० ३०० ते ३२५
बेडगी काडी ५७५ ते ६०० २२५ ते २५०
खुडवा मिरची १३० ते १४० ४५ ते ५०
गंटूर तेजा २५० ते ३०० २०० ते २२५
गंटूर३३४ २२० ते २३० ११० ते ११५
गंटूर३४१ २५०ते ३०० १३० ते १४०
गंटूर खुडवा १५० ते १८० ६० ते ६५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com