लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा अन् घेवड्याच्या भावात वाढ

लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा अन् घेवड्याच्या भावात वाढ

मार्केट यार्ड, ता. २८ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्यांची सुमारे ९० ते १०० ट्रक आवक झाली होती. बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत काहीशी आवक वाढली आहे. मात्र, फळभाज्यांना मागणीही वाढल्याने लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर स्थिर होते.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १० ते १२ टेम्पो, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून तोतापुरी कैरी प्रत्येकी एक हजार बॉक्स, कोबी प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ५ ते ६ ट्रक, कर्नाटक पावटा २ ते ३ टेम्पो आणि भुईमूग शेंगा बेळगाव वरून २ टेम्पो, तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ५ ते ६ टेम्पो, राजस्थान गाजर २ ट्रक, तर मध्यप्रदेशातून लसूण सुमारे ८ ते ९ टेम्पो आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंगा ५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार पारनेर येथून ५० ते ६० टेम्पो, कांदा सुमारे ७० ते ८० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १२०-१६०, बटाटा : २००-२६०, लसूण : १०००-२०००, आले सातारी : ९५०-१०००, भेंडी : २५०-३५०, गवार : ३००-४००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ४५०-५५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १६०-२२०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : १००-१४०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ४५०- ५००, तोंडली : कळी : ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००- २५०, गाजर : १५०-२५०, वालवर : ४००-४५०, बीट : १००-१२०, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग शेंग : ६००, मटार : ८००-८५०, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी : २००-४०० सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

पालेभाज्या महागल्या
पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटयार्डात बहुतांश सर्वच पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली असून यामध्ये शेपू, कांदापात, चाकवत, करडई, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकच्या भावात वाढ झाली आहे़, तर कोथिंबीर, मेथी, पुदीनाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़. रविवारी (ता. २८) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी तर मेथीची ७० हजार जुडींची आवक झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ८००-१२००, शेपू : ६००-१०००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००- ७००, पुदिना : ३००-६००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००- ६००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-७००, पालक : ८००-१५००.

मोसंबी, संत्री, कलिंगड, चिकूचे भाव वाढले
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात उन्हामुळे फळांची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने रविवारी मोसंबी, संत्री, कलिंगड, चिकूच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी झाली आहे. इतर बहुतांश फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (ता. २८) मोसंबी ३० ते ४० टन, अननस ४ ट्रक, संत्री ८ ते १० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबांची सुमारे ८०० ते १२०० गोणी, कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज २० ते २५ टेम्पो, चिक्कू एक हजार बॉक्स इतकी आवक झाली होती, तर कोकणातील हापूस आंब्याची सुमारे १५ हजार पेट्या, कर्नाटक येथून सुमारे २ ते ३ हजार पेटी इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१८००, मोसंबी : (३ डझन): २२०- ४००, (४ डझन) : १२०-२००, संत्री : (१० किलो) : २५०-१६५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१४०, आरक्ता: १०-४०, गणेश : ५-२५, कलिंगड : १२-१४, खरबूज : १८-२५, पपई : ८-१५, चिक्कू (दहा किलो) : ५०-४००, अननस (१ डझन) १००-६००. रत्नागिरी हापूस (कच्चा) ४ ते ६ डझन १००० ते २२००, ५ ते ८ डझन १२०० ते २५००, तर पिकलेला आंबा ४ ते ६ डझन - १५०० ते २५०० आणि ५ ते ८ डझन २००० ते २५०० रुपये.

फुलांची आवक जास्त अन् दर घसरले
हनुमान जयंतीनंतर सुट्ट्या फुलांच्या मागणीत घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत सुट्ट्या फुलांची आवक जास्त असल्याने त्याच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. लग्नसराई सुरू झाल्याने शोभिवंत फुलांना मागणी कायम आहे. आवक-जावक कायम असल्याने शोभिवंत फुलांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याची माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : २००-३००, अ‍ॅष्टर : जुडी ४०-५०, सुट्टा १५०-२००, कापरी : ४०-८०, शेवंती : १००-१८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-४०, गुलछडी काडी : ८०-१८०, डच गुलाब (२० नग) : १००-२५०, जर्बेरा : ८०-१००, कार्नेशियन : १५०-२५०, शेवंती काडी २००-४००, लिलियम (१० काड्या) १०००-१३००, ऑर्चिड ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१४०, जिप्सोफिला : ४००-६००, मोगरा : ४५०-५००.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com