कोळंबी, बांगडा वगळता 
अन्य मासळीचे भाव तेजीत

कोळंबी, बांगडा वगळता अन्य मासळीचे भाव तेजीत

मार्केट यार्ड : गणेश पेठ येथील मासळी बाजारात देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरून मासळी दाखल होत आहे. कोळंबी व बांगडा वगळता अन्य मासळीचे भाव तेजीत आहे. उन्हामुळे मटण, चिकन व अंड्यांना बेताची मागणी आहे. मटणाचे मागील आठवड्यातील दर टिकून आहेत. चिकनच्या भावात किलोमागे २० रुपयांनी तर, इंग्लिश अंडी शेकड्यामागे २० ते ३० रुपये तर गावरान अंडी ३० ते ४० रुपयांनी उतरल्याची माहिती चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
रविवारी (ता. २८) बाजारात खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची २०० ते २५० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ६०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली अशी माहिती मासळीच्या व्यापाऱ्यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १५००-१६००, मध्यम : १३००-१४००, लहान : १०००-११००, भिला : ९००-९५०, हलवा : ७००-८००, सुरमई : ८००-९००, मोठी १०००-१२००, रावस : ८००-९००, घोळ : ८००-९००, करली : ३६०-४००, करंदी (सोललेली) : ४००-४८०, भिंग : ३६०-४००, पाला : १२००-१५००, वाम : पिवळी ९००-१०००, काळी : ३६०-४००, ओले बोंबील : २५०-३६०. कोळंबी : लहान २४०-३२०, मोठी : ३६०-५००, जम्बो प्रॉन्स : १६००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ३२०-३६०, मांदेली : १४०-१६०, राणीमासा : २००-२२०, खेकडे : २५०-३६०, चिंबोऱ्या : ८००-९००. खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी : २८०-३२०, नगली : ४००-४८०, तांबोशी : ४८०-५२०, लेपा : २००-२४०, बांगडा : १८०-२२०, शेवटे : २४०, पेडवी : १२०-१४०, बेळुंजी : १६०-१८०, खुबे : १२०-१४०, तिसऱ्या : २००-२२०, तारली : १६०. नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कटला : १६०-१८०, मरळ : ३६०-४००, शिवडा : २४०, खवली : २००, आम्ळी : १४०-१६०, खेकडे : ३००-३५०, चिलापी : ६०-१६०, वाम : ५५०.
मटण : बोकड : ७४०, बोलाई : ७४०, खिमा : ७४०, कलेजी : ७८०, चिकन : २६०, लेगपीस : ३२०, जिवंत कोंबडी : १८०, बोनलेस : ३५०. अंडी : गावरान (शेकडा) ८५०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ४२५, डझन ६०, प्रतिनग ५.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com