पिंपरी शहराची पाणीकपात अखेर रद्द 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून पाणी घेतले जाते. त्यासाठी धरणातील पाणी नदीत सोडून रावेत बंधाऱ्यानजिक उभारलेल्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून प्राधिकरणातील पेठ क्रमांक 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तेथून शहरातील टाक्‍यांमार्फत पाण्याचे वितरण केले जाते. गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने सप्टेंबरपासूनच धरणातून शहरासाठी पाणी सोडावे लागले होते. तसेच मार्चपासून आठवड्यातून एक दिवस कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. सहा मेपासून 30 टक्‍के पाणीकपात करत शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता.

पिंपरी : पवना धरण शंभर टक्के भरले असून गेल्या आठ दिवसांपासून त्यातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने गुरुवारपासून (ता. 8) पाणीकपात रद्द केली. पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून 480 दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा सुरू केला आहे. 

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून पाणी घेतले जाते. त्यासाठी धरणातील पाणी नदीत सोडून रावेत बंधाऱ्यानजिक उभारलेल्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून प्राधिकरणातील पेठ क्रमांक 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तेथून शहरातील टाक्‍यांमार्फत पाण्याचे वितरण केले जाते. गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने सप्टेंबरपासूनच धरणातून शहरासाठी पाणी सोडावे लागले होते. तसेच मार्चपासून आठवड्यातून एक दिवस कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. सहा मेपासून 30 टक्‍के पाणीकपात करत शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता.

दरम्यान, 29 जूनपासून धरण क्षेत्र व नदी खोऱ्यात पावसाला सुरवात झाली होती. मात्र, पुरेसा साठा नसल्याने कपात सुरूच होती. गेल्या 15 दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. आठ दिवसांपूर्वीच धरण भरल्याने विसर्ग सुरू केला. त्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली होती. विरोधी पक्षांनीही कपात रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, महापौर राहुल जाधव यांनी जलपूजन झाल्याशिवाय कपात रद्द केली जाणार नाही, असा हेका धरला. नागरिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला होता. महापौरांच्या विरोधात व पाणीकपात रद्द करण्यासाठी "सकाळ'कडे दोन हजारांवर नागरिकांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. नागरिकांची भावना वेळोवेळी वृत्ताच्या माध्यमातून मांडल्यानंतर महापौरांनी अखेर बुधवारी (ता. 7) पवना धरणावर जाऊन सपत्निक जलपूजन केले आणि गुरुवारपासून (ता. 8) पाणी कपात रद्द केली. नागरिकांना सुमारे 83 दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागला. 

रावेत बंधाऱ्यातून उपसा 
शहराला पाणीपुरवठ्यासाठी रावेत येथे पवना नदीवर बंधारा बांधला आहे. त्यानजिक तीन टप्प्यात अशुद्ध जलउपसा केंद्र उभारले आहेत. त्यांच्या 18 पंपांद्वारे जलउपसा केला जातो. पाणीकपातीच्या काळात रोज 430 ते 440 दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जात होता. गुरुवारपासून तो 480 दशलक्ष लिटरपर्यंत वाढविला व पाणीकपात रद्द केली, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: todyonward for pcmc daily water