घरे साड्या-कुडांची; शौचालये बांधली स्लॅबची!

ज्ञानेश्वर रायते
मंगळवार, 17 जानेवारी 2017

भवानीनगर - जिल्ह्यात इंदापूर तालुका शौचालय बांधणीत सर्वांत पिछाडीवर असल्याची टीका होत असतानाच तालुक्‍यातील पवारवाडी गावात नवल घडलंय. प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील भटक्‍या नंदीवाले समाजाने पक्की, स्लॅबची शौचालये बांधलीत. विशेष म्हणजे त्यांच्यापैकी अनेकांची घरे आजही पालाची, साड्यांची, कुडाची आहेत. अनुदानाची ‘फिकीर’ न करता घरातील माय माउली रस्त्याच्या कडेला जाऊ नये म्हणून त्यांनी ही शौचालये बांधली आहेत.

जिल्ह्यात २६ हजार शौचालये नसलेल्या कुटुंबांमध्ये १४  हजार कुटुंबे ही इंदापूर तालुक्‍यातील आहेत. मात्र, याच तालुक्‍यात श्रीमंत ‘शहाण्यांची’ मानसिकता बदलणारे झणझणीत अंजन उदमाईदेवी मंदिराच्या कडेला गायरानात वसलेल्या नंदीवाले समाजातील ३१ कुटुंबांनी घातले आहे. या कुटुंबांनी एकाच वेळी शौचालये बांधली. अर्थात याची कहाणीही विशेष अशीच आहे. 

‘उघड्यावर शौचास  जाणे काही पटेना’
रामचंद्र सुरेश वाघमोडे यांचे घर साड्या शिवून तयार केलेले आहे, अगदी पालच म्हणा! परंतु त्याचे शौचालय एकदम खणखणीत, बंगल्यात असावे तसेच स्लॅब ओतून केलेले आहे. एकदम चकाचक शौचालय कसे बांधले, असे विचारता ते म्हणाले, ‘‘आपण सहा महिने कटलरीचा धंदा करतो. रस्त्यावर बसून वस्तू विकतो. मात्र, बायको उघड्यावर शौचास जाते हे काही पटेना, सायबांनी सांगितलं, का हे काय बराबर नाय; मग काय, संडासच बांधायचं ठरवलं, झालं ना बांधून! दोन संडास एकाच जाग्यावर बांधली, बापानं अन्‌ मी १७ हजार रुपये घातलं त्यात.’’ 

Web Title: toilet construction by poor people