पुणे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शाळांमधील मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांची झाली दुरवस्था

ZP Toilet
ZP Toilet

पुणे - जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक जिल्हा परिषद शाळांमधील मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यातील १ हजार ३३४ स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याशिवाय अन्य ४६१ स्वच्छतागृहे मोडकळीस आली आहेत. मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांची संख्या १ हजार ७९५ एवढी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण तीन हजार ६४८ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये-मुला-मुलींसाठी किमान प्रत्येकी एक स्वच्छतागृहाचे युनिट उभारण्यात आलेले आहे. आजघडीला यापैकी निम्याहून अधिक शाळांमधील स्वच्छतागृहांची अवस्था वाईट झाली आहे. तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असलेल्यांमध्ये मुलांच्या ६६४ व मुलींच्या ६७० स्वच्छतागृहांचा समावेश आहे. मोडकळीस आलेल्यांमध्ये मुलांची २६२ व मुलींची १९९ स्वच्छतागृहे आहेत. त्यांच्या अवस्थेबाबतची माहिती संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून जिल्हा परिषदेने ऑनलाइन मागितली होती. यातून ही बाब स्पष्ट झाली. शाळांमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या कालावधीत सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत स्वच्छतागृहांची उभारणी केली होती. तसेच शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांची संख्या (कंसात मोडकळीस आलेली) 

  • आंबेगाव - ८० (३९)
  • बारामती - ८३ (४४)
  • भोर -९३ (६९) 
  • दौंड - ९८ (३९)
  • हवेली -१०१ (९)
  • इंदापूर -११७ (४६)
  • जुन्नर - १६० (३४)
  • खेड -१२४ (५७)
  • मावळ -१२३ (१६)
  • मुळशी -९४ (२१)
  • पुरंदर -१०२ (३३)
  • शिरूर -६९ (२४)
  • वेल्हे - ८९ (३०)

अशी आहे स्थिती

  • जिल्हा परिषद शाळांची संख्या -  ३६४८
  • दुरवस्था झालेली एकूण स्वच्छतागृहे - १७९५
  • मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे - ४६१ 
  • दुरुस्तीसाठीची स्वच्छतागृहे - १३३४
  • दुरुस्तीसाठी आवश्यक निधी - ७ कोटी ७ लाख ९५ हजार रुपये
  • नव्याने स्वच्छतागृहे उभारणे - १२ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये 

या उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दुरुस्ती आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृह बांधकामाबाबतचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या अंदाजपत्रकानुसार दुरुस्तीसाठी ७ कोटी सात लाख ९५ हजार रुपये तर, मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांचे नव्याने बांधकाम करण्यासाठी १२ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com