टोल प्रशासनाच्या वादाचा प्रवाशांना बसतोय फटका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

सातारा रस्त्यावर टोल नाक्‍यापुढे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीची बससेवा केव्हा सुरू होणार, असा प्रश्‍न पीएमपी प्रवासी मंचने प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. टोल प्रशासनाबरोबरील वाद प्रशासनाला सोडविता येत नसल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचेही मंचने म्हटले आहे.​

पुणे - सातारा रस्त्यावर टोल नाक्‍यापुढे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीची बससेवा केव्हा सुरू होणार, असा प्रश्‍न पीएमपी प्रवासी मंचने प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. टोल प्रशासनाबरोबरील वाद प्रशासनाला सोडविता येत नसल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचेही मंचने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातारा रस्त्यावर खेड शिवापूरजवळील टोल नाक्‍यावर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहनांना शुल्क न आकारता प्रवेश दिला जातो. मात्र, पीएमपीकडून टोल आकारण्याबाबत टोल प्रशासन ठाम आहे. पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक असल्यामुळे पीएमपीलाही मोफत प्रवेश दिला जावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

धक्कादायक : नवरा- बायकोच्या भांडणात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा बळी

त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशीही पीएमपीने संपर्क साधला आहे. परंतु, अद्याप त्यातून मार्ग निघालेला नाही. बससेवा सुरू करण्यासाठी टोल नाक्‍यापलीकडील गावांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ५ रुपये जादा दर आकारण्याचा प्रस्ताव पीएमपीने तयार केला. परंतु, अद्याप त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे टोलनाका कंत्राटदाराबरोबरील वाद तातडीने मिटवून प्रवाशांसाठी बस सुरू कराव्यात, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचचे दत्तात्रेय फडतरे यांनी पीएमपीकडे केली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toll admin controversy hits commuters