esakal | टोल वसुली जोरात सुरू मात्र टोल नाक्यावरील स्वच्छतागृह बंद
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-शिवापूर टोल

टोल वसुली जोरात सुरू मात्र टोल नाक्यावरील स्वच्छतागृह बंद

sakal_logo
By
महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : टोल वसुली जोरात सुरू आणि टोल नाक्यावरील स्वच्छतागृह बंद अशी परिस्थिती पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या परिस्थितीमुळे याठिकाणी प्रवाशांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. मात्र खेड-शिवापूर करत आहेत.

प्रवाशांना प्रवास करताना चांगले रस्ते आणि रस्त्यावर चांगल्या सुविधा हव्या असतील तर टोल भरावाच लागेल, असे नुकतेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. मात्र खेड-शिवापूर टोल नाक्यावर मात्र टोल भरूनही प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा: विक्रमी उंचीवर शेअर मार्केट! 958 अंकांच्या तेजीसह 60,000 चा टप्पा नजीक

पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर टोल नाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र टोल नाके आहेत. साताऱ्याकडे जाणारा टोल नाका हा सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला आहे. मात्र याठिकाणी केवळ नावापुरते स्वच्छतागृह उभारण्यात आले असून ते स्वच्छतागृह उभारल्यापासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागते.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

पुरुष प्रवाशांना याठिकाणी अनेकदा वाहने थांबवून नैसर्गिक विधीसाठी उग्जड्यावर जावे लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होते. सुमारे चार वर्षांपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावरील स्वच्छता गृहाची अशी अवस्था आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. टोल वसुली जोरात सुरू अन सुविधा नाहीत त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस म्हणाले, "पुणे-सातारा रस्त्याचे वेगवेगळे काम करणारे जे उप ठेकेदार होते ते रिलायन्स इन्फ्राकडून बदलण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता या रस्त्याची रखडलेली सर्वच कामे वेगाने सुरू होतील. त्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावरील स्वच्छतागुह ही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल."

loading image
go to top