टोमॅटोचे भाव वाढले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० रुपये या भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. गेल्या आठवड्यातील सततच्या पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर टोमॅटोचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

मार्केट यार्ड - गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० रुपये या भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. गेल्या आठवड्यातील सततच्या पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर टोमॅटोचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोची आवक कमी होत आहे. परिणामी किरकोळ तसेच घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव वाढत आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोच्या दर्जानुसार ३०० ते ३५० रुपये दहा किलोचा भाव असल्याची माहिती घाऊक बाजारातील अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. 

पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड कमी केली होती. त्यातच गेल्या काही दिवसांत पुणे विभागात सतत पाऊस पडल्याने टोमॅटो मोठ्या प्रमाणावर खराब होत आहेत. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढल्याची माहिती किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomato Rate Increase