लासुर्ण्यामध्ये कालव्याच्या पाण्यासाठी उद्या रास्तारोको आंदोलन

राजकुमार थोरात 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, बेलवाडी परीसरातील पिके पाण्याअभावी जळू लागली असून नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रंमाकाच्या वितरिकेला पाणी सोडावे यासाठी लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील चिखली फाटा येथे बारामती-इंदापूर राज्यमार्गावर शुक्रवार (ता.१३)रोजी रास्तारोकाे आंदोलन करण्यात येणार आहे.

१३ मार्च रोजी धरणातुन नीरा डाव्या कालव्यामध्ये शेतीसाठी  उन्हाळी हंगामाचे पाण्याचे आवर्तन सुरु केले आहे. एक महिना झाला तरीही तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळू न जावू लागली आहेत. पश्‍चिम भागामध्ये कालव्यातुन दररोज २०० क्युसेक पेक्षा जास्त पाणीचोरी व गळती होत  असल्यामुळे पाणी मिळण्यास शेतकऱ्यांना उशीर होत आहे.  चालू वर्षी  धरणामध्ये समाधानकारक पाणी साठा असल्यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्याच्या भरोशावर ऊस,डाळिंब, केळी,मका,कडवळ पिके केली पिकांच्या लागवडी केल्या आहेत. मात्र धरणातुन एक महिन्यापूर्वी कालव्यामध्ये पाणी सोडून पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उद्या शुक्रवार(ता.१३) रोजी लासुर्णे जवळील चिखली फाटा येथे बारामती -इंदापूर राज्यमहामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे.या रास्तारोको मध्ये नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रंमाकाच्या वितरिकेवरती अवलंबून असणारे शेतकरी सहभागी होणार आहेत. 

अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?
पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी गेल्या आठवड्यामध्ये खडकवासल्याच्या पाण्याचे नियोजन केले नसल्याच्या कारणावरुन एका अधिकाऱ्यावर कारवाई केली होती. नीरा डाव्या कालव्यामतुन बेसमुार पाणी चोरी व गळती होत असल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाचे पाणी उशीरा मिळत आहे. यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्‍न शेतकरी विचारु लागले आहेत.

Web Title: tomorrow rastaroko for canole water in lasurne