पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

महापालिकेच्या सर्वच जलशुध्दीकरण केंद्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यामुळे गुरुवारी (ता.7) सपूंर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (ता.8) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुणे - महापालिकेच्या सर्वच जलशुध्दीकरण केंद्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यामुळे गुरुवारी (ता.7) सपूंर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (ता.8) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वडगाव जलकेंद्रासह पर्वती (पंपिंग स्टेशन) लष्कर, वारजे, एसएनडीटी, नवीन होळकर या जलकेंद्रांतील आवश्‍यक ती कामे करण्याचे नियाजेन कमहापालिकेने केले. त्यामुळे या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow Water Supply close in pune city