

Severe Flooding Hits Ambegaon Villages; Agriculture Ravaged by Rising Vel River
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सोमवारपासून बुधवारी सकाळपर्यंत कोसळलेल्या संततधार पावसामुळे परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वेळ नदीला महापूर आला आहे. नदीकाठच्या शेतजमिनी, पिके आणि सुपीक माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.