शितपेयातून गुंगीचे औषध देवून विवाहितेवर अत्याचार 

जनार्दन दांडगे
Wednesday, 16 September 2020

 नवरा परगावी गेल्याची संधी साधून एका विवाहित महिलेस शितपेयातून गुंगीचे औषध देवून, तिच्यावर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उरुळी देवाची (ता. हवेली) उघडकीस आली आहे.

लोणी काळभोर (पुणे) : नवरा परगावी गेल्याची संधी साधून एका विवाहित महिलेस शितपेयातून गुंगीचे औषध देवून, तिच्यावर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उरुळी देवाची (ता. हवेली) उघडकीस आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ही घटना दहा दिवसांपुर्वी घडली असून, याप्रकरणी एकवीस वर्षीय पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी गणेश चंद्रकांत डांगे (रा. सोलापुर, पुर्ण पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश डांगे व पिडीत महिलेचे पती हे दोघेजण एक वर्षापासttन मित्र असून, दोघांचेही एकमेकांच्या घऱी येणे जाणे होते. पिडीत महिलेचे पती वैयक्तिक कामानिमित्त 30 ऑगष्ट रोजी पाच दिवसांसाठी परगावी गेले होते. ही संधी साधून गणेश डांगे याने 2 सप्टेंबर रोजी महिलेच्या घरी जाऊन, पिडीत महिलेवर प्रेम करत असल्याचे सांगितले. मात्र पिडीत महिलेने गणेश डांगे यास शिवीगाळ करुन घरातून हाकलून दिले. त्यानंतर तीन दिवसांनी गणेश डांगे याने संबधित महिलेची माफी मागण्याच्या कारणावरुन घऱात प्रवेश मिळवला.

गणेश याने पुन्हा चुक करणार नाही अशी कबुली दिल्याने, महिलेने ही माफ करत असल्याचे गणेशला सांगितले. यावर गणेश याने त्याच रात्री शितपेयाची बाटली आणली. व त्यानंतर विवाहितेशी गोड बोलून, गणेश याने विवाहितेची लहान मुलगी व विवाहितेला गुंगीचे औषध टाकलेले शितपेय पाजले. शितपेय पिताच, विवाहीतेला काही वेळात गुंगी आली व त्यानंतर ती बेशुध्द झाली. त्यानंतर तिच्यावर डांगेने आत्याचार केले. 

दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महिलेला जाग आली. जाग येताच तिच्या अंगावरील कपड्यांची अवस्था पाहून तिच्या लक्षात आले की, गणेश डांगे याने शीतपेयामधून गुंगीचे औषध देवून जबरदस्तीने आत्याचार केल्याचे तिच्या लक्षात आले. झालेल्या प्रकारामुळे ती खुप घाबरून गेली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत नवरा घऱी नसल्याने घडलेल्या घटनेची कुठेही वाच्यता  विवाहितेने केली नाही. मात्र विवाहितेचा नवरा परगावावरुन घरी आल्यावर घडलेल्या घटनेची माहिती विवाहितेने नवऱ्याला सांगितली. विवाहितेची तब्बेत बिघडल्याने, अखेर घडलेल्या घटनेची तक्रार मंगळवारी (ता. 15) रोजी ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात जावून दाखल करण्यात आली. दरम्यान आरोपी गुन्हा दाखल होण्यापुर्वीच फरार झाला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torture of a married woman by giving her a narcotic from a soft drink