टूर कंपनीला ग्राहकाकडून कपात केलेले पैसे व्याजासह परत द्यावे लागणार

मिनी युरोप टूरसाठी केलेले बुकिंग व्हिसा नाकारल्याचे कारण देत रद्द
टूर कंपनीला ग्राहकाकडून कपात केलेले पैसे व्याजासह परत द्यावे लागणार
टूर कंपनीला ग्राहकाकडून कपात केलेले पैसे व्याजासह परत द्यावे लागणारsakal

पुणे : मिनी युरोप टूरसाठी केलेले बुकिंग व्हिसा नाकारल्याचे कारण देत रद्द करीत ग्राहकाने जमा केलेल्या रकमेतून कपात केलेले ६३ हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. थॉमस कुक या टूर कंपनीला हे आदेश देण्यात आला आहे.

आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर आणि सदस्य संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. याबाबत प्रमिला करनानी (रा. सदाशिव पेठ) यांनी ॲड. अजिंक्य धेंडे आणि ॲड. विक्रम जांभळे यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती. टूर कंपनीने सेवेत त्रुटी ठेवल्याने ग्राहकास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. तक्रारदार यांना ६३ हजार रुपये जमा केलेल्या तारखेपासून १० टक्के व्याजासह परत करावेत. त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी ३० हजार रुपये आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी १० हजार रुपये द्यावेत, असा आदेश आयोगाने दिला आहे.

टूर कंपनीला ग्राहकाकडून कपात केलेले पैसे व्याजासह परत द्यावे लागणार
सातारा : पती-पत्नीच्या भांडणामुळे 10 संसारांची राखरांगोळी

तक्रारदार यांनी टूर थॉमस कुकमार्फत आयोजित मिनी युरोप टूरसाठी सात दिवसांचे बुकिंग केले होते. त्यासाठी त्यांनी एक लाख ४७ हजार ९४२ रुपये कंपनीत योग्य मुदतीमध्ये जमा केले होते. या रकमेत विमान प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि व्हिसा अशा सर्व बाबींचा समावेश होता. टूरसाठी सर्व आवश्यक ती कागदपत्रे तक्रारदार यांनी कंपनीकडे दाखल केली होती. तसेच सहलीसाठी आयोजित केलेली सर्व सेशनला ते उपस्थित होते.

सहलीच्या आदल्या दिवशी व्हिसा नाकारल्याचे समजले :

सहलीच्या एक दिवस आधी त्यांना कंपनीकडून फोनद्वारे कळविण्यात आले की, तुमचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही सहलीसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी टूर कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना अपु-या कागदपत्रांमुळे व्हिसा नाकारला गेल्याचे समजले. त्यानंतर कंपनीने अर्जदार यांच्याकडून घेतलेल्या पैशांपैकी ६३ हजार रुपये कोणतेही कारण न देता कपात केले. कपात केलेली रक्कम परत न दिल्याने तक्रारदार यांनी आयोगात तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com