Video : विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची पाच तासाने सुटका

trekker
trekker

पिंपरी चिंचवड : विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची तब्बल पाच तासाने सुटका झाली. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश आले आहे. अमर कोरे असं अडकलेल्या तरुणाचे नाव आहे.

मार्ग माहीत नसताना 8 ते 10 हौशी तरुणांनी भाजे लेणीकडून विसापूर किल्ल्याची चढाई सुरू केली. गप्पांत गुंतून किल्ला दिसतोय म्हणून तरुणांनी आगेकूच केली. पहिला टप्पा सर ही केला, पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले. कसंबसं पुढं बाहेर पडले, वर पाहिल्यावर त्यांना किल्ल्याचा बुरुज दिसला. मागचा-पुढचा विचार न करता ते बुरुंजाच्या दिशेने मार्गस्थ झाले. पण ही तीव्र चढाई अमरला काही झेपली नाही. तो अशा ठिकाणी अडकला तिथून न वर चढू शकत होता, न खाली उतरू शकत होता. पाय घसरला तर तो थेट खोल दरीत पडण्याची भीती होती. अशात ही मित्रांनी अर्धा तास त्याला वर घेण्याचे प्रयत्न केले.

नंतर ग्रुपमधील कौशिक पाटीलने शिवदुर्ग रेस्क्यू टीमचा नंबर मिळवला आणि ही बाब कानावर टाकली. व्हाट्सऍपवर घटनास्थळ स्पष्ट होईल असे व्हिडिओ शिवदुर्गने मागवले. मग शिवदुर्गाच्या व्हाट्सऍप ग्रुपवर मेसेज टाकून बचावकार्याला टीम सज्ज करण्यात आली. घटनास्थळाच्या परिसरात टीम सदस्य सागर कुंभार तातडीनं मार्गस्थ झाला आणि अडकलेल्या अमरला पकडून ठेवलं. कौशिकच्या फोननंतर साधारण दीड तासात टीम घटनास्थळी पोहचली. बचावकार्य सुरू झालं, पण दमदार पावसाने हजेरी लावली. अशात ही टीम ने तमा बाळगली नाही. विकास मावकर ने खाली उतरायची तयारी दर्शवली, दोरी आणि हार्नेसच्या साह्याने विकास कसाबसा तो अमरच्या खाली पोहचला. अमरला ही हार्नेस देण्यात आलं. मग सागर आणि विकास त्याला दोरीच्या साह्याने वर घेऊन आले. अशा रीतीने या हौशी पर्यटकाची तब्बल पाच तासाने सुखरूप सुटका झाली. अमर ने शिवदुर्ग टीमचे आभार मानले. त्यामुळं हौशी पर्यटकांनी यातून धडा घ्यावा आणि पर्यटनस्थळांची अपुरी माहिती घेऊन पर्यटन करण्याचं धाडस करू नये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com