Pune News : सकाळी सात वाजता सिंहगड हाऊसफुल्ल

वाहनांसह पायवाटेने येणाऱ्या पर्यटक आणि ट्रेकर्सची संख्या वाढली; आरोग्यासाठी सिंहगडवारीला प्राधान्य देत असल्याची भावना
tourists and trekkers crowd on Sinhagad fort at 7 am  Sinhagadwari for health pune
tourists and trekkers crowd on Sinhagad fort at 7 am Sinhagadwari for health punesakal

सिंहगड : थंडीचा कडाका वाढला असतानाही रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सिंहगड पर्यटक, ट्रेकर्स आणि दुर्गप्रेमींनी अक्षरशः फुललेला दिसून आला. डोणजे व कोंढणपूर मार्गे वाहनांनी तसेच आतकरवाडी व कल्याण मार्गे पायवाटेने दर रविवारी सिंहगडावर येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

धकाधकीच्या जीवनात एक दिवस शरीरासाठी मिळावा म्हणून सिंहगडवारी सुरू केल्याची भावना पर्यटक, ट्रेकर्स व्यक्त करताना दिसत आहेत. मागील काही वर्षांपासून सिंहगडावर दर शनिवारी व रविवारी पायी ये-जा करणारांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

पहाटे तीन वाजल्यापासून आतकरवाडी व कल्याण गावच्या बाजूने काही ट्रेकर्स सिंहगडावर चढायला सुरुवात करतात. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी दिवसभर पायवाटेवर वर्दळ दिसून येते.

यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, असे अनेक क्षेत्रांत काम करणारे नागरिक असतात. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांनीही गडावर येऊन पिठलं-भाकरी,

कांदा-भजी , रानमेवा, दही अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक नागरिक कुटुंबासह सिंहगडावर येतात. अशाच ट्रेकर्स, पर्यटक, दुर्गप्रेमी व हौशी नागरिकांच्या गर्दीने रविवारी सकाळी सिंहगड फुललेला दिसून येत होता.

म्हणून वाढतेय सिंहगडावर गर्दी

•सोशल मिडियामुळे सिंहगडावरील ऐतिहासिक संदर्भ आणि निसर्ग सौंदर्याचा प्रचार-प्रसार.

•शहरापासून हाकेच्या अंतरावर.

•दळणवळणाची सोय.

•ट्रेकिंगसाठी पायवाट.

•शुद्ध हवा आणि चवदार खाद्यपदार्थ, रानमेवा

"मागील दहा वर्षांपासून नित्यनेमाने आठवड्यातून एकदा सिंहगडावर पायवाटेने येतो. आठवडाभराचा कामाचा ताण गडावर आल्यानंतर निघून जातो."

- प्रकाश फासे, व्यावसायिक, कोथरूड.

"नोकरीमुळे आठवडाभर धावपळ असते. रविवारी सुट्टी असते त्यामुळे सकाळी लवकर गडावर येऊन जातो. आता सवय लागल्याने सिंहगडाची वारी चुकवू वाटत नाही."

- विजय गावंधरे, नांदेड सिटी.

"1972 सालापासून आम्ही सिंहगडावर ट्रेकिंगसाठी येत आहोत. गिरिभ्रमण म्हणून आमचा साठ ते सत्तर जणांचा ग्रुप आहे. व्यायाम होतो आणि विचारांचीही देवाणघेवाण होते."

- रविंद्र भोसले, गिरिभ्रमण ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य, पद्मावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com