Pahalgam Rescue : पर्यटक आमचे देव, त्यांची सेवा भाग्यच; काश्मीरमधील वाहनचालक सोहेल यांची भावना स्थानिक तरुणांकडून आधार
Maharashtra Tourism : काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर काही मिनिटांत संकटाच्या सावटात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना काश्मिरी तरुणांनी देव मानून मदतीचा हात दिला. "पर्यटक आमचे देव आहेत" असे सांगणाऱ्या वाहनचालक सोहेल यांच्या भावना आणि कृतीने ‘काश्मिरीयत’चे जिवंत उदाहरण घडले.
पुणे : ‘‘पर्यटक आमच्यासाठी देव आहेत. त्यांची सेवा करणे हेच आमचे कर्तव्य आहे. आमच्या हातून त्यांची सेवा घडते, हे आमच्यासाठी भाग्याचेच आहे,’’ अशा शब्दांत पर्यटकांचे वाहनचालक सोहेल यांनी भावना व्यक्त केल्या.