कोरोनाचा परिणाम थेट पुण्यातील खेळण्यांवर! कसा?

toy prices increases in Pune due to Corona Virus
toy prices increases in Pune due to Corona Virus

पुणे : कोरोना व्हयरसमुळे चीनसह इतर देशांवरही त्याचा परिणाम झाला असून, चीमनधून निर्यात होणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. चीनमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंपैकी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे खेळणी. भारताच्या बाजारपेठेत चीनची खेळणी मोठ्या प्रमाणात आयात होतात. पण कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर परिणाम झाला असून खेळण्याच्या व्यापारावरही त्याचा मोठा परिणाम झालाय व त्यामुळे खेळण्यांच्या किंमतीत धक्कादायक वाढ झाली आहे.

भारतात ७०% खेळणी ही चीनवरून आयात होतात. यातील इलेक्ट्रॉनिक व प्लास्टीकच्या खेळणी मोठ्या प्रमाणात आयात होतात. कोरोनामुळे चीनमधील मार्केटमध्ये खेळण्यांचे उत्पादन कमी झाले असून, इतर देशांतील निर्यातीमध्येही फरक पडलाय. यामुळे भारतातील, खासकरून पुण्यातील खेळण्यांच्या किंमतीत ४०% टक्क्याने वाढ झाली आहे, अशी माहिती खेळणी व्यावसायिकांनी दिली. 

देशात ७० टक्के खेलणी ही चीनमधून येतात. यात इलेक्ट्रॉनिक कार, म्युझिकल टॉईज, बाहुल्या, किचन सेट, रिमोटवरची खेळणी अशी सगळ्याच खेळण्यांचा समावेश आहे.  रिमोट किंवा बॅटरीवरील खेळण्यांची किंमत ७९०-८०० रूपयांवरून थेट १००० रूपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे सर्वच खेळण्यांची किंमत ही जवळपास २० ते ६० टक्क्यांनी वाढली आहे, असे पुण्यातील खेळणी विक्रेत्यांनी सांगितले.  

खेळण्यांसह फर्निचरवरही त्याचा परिणाम झाला असून फर्निचरच्या किंमतीतही जवळपास ३५ ते ४० टक्क्यांइतकी वाढ झाली आहे. फर्निचर किंवा त्या प्रकारचे लाकूडही भारतात चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात होत होते. कोरोनामुळे त्यावरही परिणाम झाला असून त्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

कोरोनामुळे चीनमधील १७०० लोकांचा मृत्यू झाला असून, भारतातही कोरोनाची लक्षणे असलेले काही रूगण सापडले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com