Narayangav Accident : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारसायकलची धडक बसून तरुणाचा मृत्यू

जुन्नर येथील पुणे-नाशिक महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात येडगाव (ता. जुन्नर) येथील तरुणाचा मृत्यू.
Nikhil Bhise
Nikhil BhiseSakal

नारायणगाव - जुन्नर येथील पुणे नाशिक महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात येडगाव (ता. जुन्नर) येथील निखील चंद्रकांत भिसे (वय-23) या तरुणाचा मृत्यू झाला. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास निखील भिसे हा पुणे-नाशिक महामार्गावरून मोटर सायकल वरून नारायणगाव येथून येडगाव येथे जाण्यास निघाला होता. दरम्यान येथील परिवार हॉटेलच्या जवळ ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली महामार्गाच्या कडेला उभी होती.

रात्रीचा अंदाज न आल्याने मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसली. निखील हा अपघातात गंभीर जखमी झाला. स्थानिक तरुणांनी त्याला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. अपघात झाल्यानंतर चालक पसार झाला.

महादेव शेलार (सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगाव) - पुणे नाशिक महामार्गावरून ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉल्या मधून उसाची वाहतूक अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून वाहतुकीला सुद्धा अडथळा होत आहे.

उसाची वाहतूक करताना पुरेशी काळजी घ्यावी. अशी लेखी सूचना साखर कारखाना प्रशासनाला करण्यात येणार आहे. अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना वाहनाचा वेग नियंत्रित ठेवून नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com