esakal | बारामतीच्या व्यापाऱ्यांचा संयम संपला...अजितदादांना पाठवला मॅसेज...
sakal

बोलून बातमी शोधा

baramati.jpg

शहरातील व्यापा-यांनी गेले 14 दिवस कमालीचा संयम बाळगला आहे, मात्र सोमवारपासून (ता. 21) व्यापारी आपापले व्यवहार पूर्ववत सुरु करणार असल्याची माहिती बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी व मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर यांनी दिली.

बारामतीच्या व्यापाऱ्यांचा संयम संपला...अजितदादांना पाठवला मॅसेज...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शहरातील व्यापा-यांनी गेले 14 दिवस कमालीचा संयम बाळगला आहे, मात्र सोमवारपासून (ता. 21) व्यापारी आपापले व्यवहार पूर्ववत सुरु करणार असल्याची माहिती बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी व मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर यांनी दिली. दरम्यन दुकानांची वेळही सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत ठेवण्याचे व्यापा-यांनी निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यामुळे बारामतीत 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. शहराच्या आरोग्याचा विचार करुन सर्वच व्यापा-यांनी 14 दिवस सलग दुकाने बंद ठेवून या निर्णयाला पाठिंबा दिला होता. आता मात्र सोमवारनंतर व्यापारी दुकाने बंद ठेवण्याच्या मनःस्थितीत नसून सर्व व्यापारी आपापले व्यवहार पूर्ववत सुरु करणार असल्याचे आज बारामतीत व्यापा-यांच्या झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. व्यापा-यांची आता मानसिकता दुकाने उघडण्याची असल्याचे आजच्या बैठकीत समोर आले. आता व्यापारी दुकाने बंद ठेवण्यास तयार नाही, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कर्मचा-यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न यातून निर्माण झाला आहे असे सांगितले गेले. 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

 दरम्यान गुजराथी व वडूजकर या दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मेसेज पाठवून सोमवारपासून बारामतीची बाजारपेठ पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात प्रशासनास आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. स्वताः गुजराथी यांनीच या बाबत माहिती दिली. दुकानांची वेळही आता सकाळी नऊ ते संध्याकाळी सात करावी अशीही विनंती करण्यात आली आहे. पाचपर्यंत दुकाने उघडी राहिल्यामुळे जास्त गर्दी होत असून सात पर्यंत केल्यास शहरातील ग्राहक थोडे उशीरा येऊ शकतील असा या मागचा व्यापा-यांचा उद्देश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजच्या बैठकीला नरेंद्र गुजराथी व महावीर वडूजकर यांच्यासोबत सुशील सोमाणी, नरेंद्र मोता, अभय गादीया, नाना शेळके, शैलेश साळुंके, प्रवीण आहुजा, स्वप्नील मुथा, सुजय निंबळककर, महेंद्र ओसवाल, किरण गांधी, बाळू चांदगुडे यांच्यासह गाळेधारक संघटनेचेही प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.