esakal | प्रशासकांच्या दालनात व्यापाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Traders sit in in the administrators hall for agitation in market yard

भुसार बाजारातील रस्ते खराब झाले असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहन प्रवास धोकादायक झाला आहे. यामुळे वाहनांचे नुकसान तर होतच आहे. 

प्रशासकांच्या दालनात व्यापाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारातील खराब झालेल्या रस्त्यांचे काम त्वरित करण्यात यावे. तसेच समितीने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. यासह विविध मुलभुत सुविधा पुरविण्याच्या मागण्यांसाठी दि पूना मर्चंटसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २२) समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

भुसार बाजारातील रस्ते खराब झाले असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहन प्रवास धोकादायक झाला आहे. यामुळे वाहनांचे नुकसान तर होतच आहे. परंतु अनेक ठिकाणी अपघात देखील झालेले आहेत. मात्र या सगळ्या प्रकाराकडे बाजार समिती प्रशासन मात्र गेली अनेक वर्ष दुर्लक्ष करीत आहे. बाजार समिती केवळ कामे करण्याची आश्वासन देते मात्र काम करत नाही.

उर्से टोल नाक्यावर घातला होता धिंगाना; गजानन मारणेच्या 17 साथीदारांना अटक​
समितीला वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलनाचा इशारा देऊनही काम होत नसल्याने दि पूना मर्चंटस् चेंबरचे पदाधिकारी प्रशासकांना भेटण्यासाठी गेले. मात्र, प्रशासक गरड हे पदाधिकाऱ्यांना केबिनमध्ये बसवून दुसऱ्या बैठकीला गेले. त्यामुळे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकांच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले. रस्त्यांची कामे ३१ मार्चपर्यंत पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, नगरसेवक प्रवीण चोरबेले, सचिव विजय मुथा, रायकुमार नहार आदी उपस्थित होते.

रस्ते, वीज, पाणी या मुलभुत सुविधा व्यवस्थित द्या एवढीच व्यापाऱ्यांची मागणी आहे. बाजार समितीच्या रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने बाहेरगावचे व्यापारी बाजारात येण्यास घाबरत आहेत. कोणत्याही सुविधा आणि सवलती दिल्या जात नाहीत.
- प्रविण चोरबेले, नगरसेवक

रस्त्याची कामे येत्या ३१ मार्च पर्यंत पुर्ण केली जातील. याबाबत संबंधित ठेकेदारालाही तशा सूचना दिल्या आहेत.
- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती

 स्पर्धा परीक्षेसाठी निवडलं एक सेंटर, आलं भलतंच; उमेदवारांमध्ये गोंधळ​ 

...तर भुसार बाजार बेमुदत बंद ठेवणार

बाजारात धुळ, खड्ड्यांचे साम्राज्य असून  व्यापाऱ्यांना याचा त्रास होत आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासकांना वेळोवेळी भेटूनही रस्त्यांची कामे होत नाहीत. प्रशासकच म्हणतात अधिकारी माझे ऐकत नाही, अशावेळी त्यांनी अधिकारी निलंबित केले पाहिजेत. यात सुधारणा न झाल्यास भुसार बाजार बेमुदत बंद करण्याचा इशारा, दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिला.

 
सोळा कोटींच्या निविदा तरीही कामे अर्धवटच

बाजार समितीने २०१८ मध्ये १६ कोटी १९ लाख ५२ हजार ७७२ रुपयांच्या ई निविदा काढून रस्त्यांची कामे सुरू केली होती. परंतु अद्यापही बाजारात रस्त्यांची कामे ६०-७० टक्केच झाली आहेत. तर झालेले रस्ते ही उखडले आहेत. त्यामुळे निविदा काढताना ठेकेदारांना मुदतीची मर्यादा घालून दिली का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा