उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

जनार्दन दांडगे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व या घटनेतील आरोपींना चार दिवसानंतरही अटक करण्यात पोलिसांना आलेले अपयश याच्या निषेधार्थ उरुळी कांचन व परिसरातील व्यापाऱ्यांच्या वतीने शनिवारी (ता. 17) दिवसभर उस्फुर्तपणे क़डकडीत बंद पाळण्यात आला. विशेषबाब म्हणजे व्यापाऱ्यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवणार असल्याची कसलीही कल्पना अथवा आगावु नोटीस पोलिसांना अथवा व्यापाऱ्यांच्या स्थानिक संघटनना दिली नसल्याची बाब पुढे आली आहे. 

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व या घटनेतील आरोपींना चार दिवसानंतरही अटक करण्यात पोलिसांना आलेले अपयश याच्या निषेधार्थ उरुळी कांचन व परिसरातील व्यापाऱ्यांच्या वतीने शनिवारी (ता. 17) दिवसभर उस्फुर्तपणे क़डकडीत बंद पाळण्यात आला. विशेषबाब म्हणजे व्यापाऱ्यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवणार असल्याची कसलीही कल्पना अथवा आगावु नोटीस पोलिसांना अथवा व्यापाऱ्यांच्या स्थानिक संघटनना दिली नसल्याची बाब पुढे आली आहे. 

गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपी स्थानिक असल्याने, दोन्ही आरोपी गावात राजरोसपणे फिरत असतांनाही पोलिस यंत्रणा आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या न आवळल्यास, त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे व्यापाऱ्यांच्या वतीने लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. 

पुणे-सोलापुर महामार्गापासुन अवघ्या पन्नास मिटर अंतरावर उरुळी कांचन गावातील महात्मा गांधी रस्त्यावर इंदर वापारीमल दर्डा यांच्या मालकीचे वापारीमल सावलदास या नावाचे कपडयाचे दुकान आहे. या दुकानाच्या दिशेने चार दिवसापुर्वी सायंकाळी सहा वाजता मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर आरोपी पळुन गेले होते. मात्र ग्रामपंचातीच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातुन वरील दोन्ही आरोपी निष्पन झाल्याने, लोणी काळभोर पोलिसांनी ऋषभ उर्फ ऋषी रमेश बडेकर व दिपक दत्तात्रय धनकुटे या दोघांच्या विरोधात खंडनीचा गुन्हा दाखल केलेला असून दोघांच्यावरही यापुर्वी गुन्हे दाखल झाल्याचे समजते. 

या घटनेला चार दिवस झाले तरीही पोलिस आरोपींना अटक करत नाही अथवा उरुळी कांचन व्यापारी संघटना आरोपींच्या अटकेसाठी पोलिस यंत्रणांवर दबाव टाकत नसल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी शनिवारी सकाळ पासुन आपआपले व्यवहार बंद ठेवले. सकाळचे दहा वाजले तरी उरुळी कांचन परीसरात एकही दुकान उघडले नसल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. याबात अधिक माहिती घेतली असता, कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडनीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व या घटनेतील आरोपीना चार दिवसानंतरही अटक करण्यात पोलिसांना आलेले अपयश याच्या निषेधार्थ उरुळी कांचन व परीसरातील व्यापाऱ्यांनी स्वयमंस्फुर्तीने बंद पाळल्याची बाब पुढे आली.

याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर व्यापाऱ्यांच्या वतीने बोलतांना उरुळी कांचन व्यापारी संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ''चार दिवसांपुर्वी गावातील वर्दळीच्या व भरवस्तीतील कापड दुकानावर खंडणीसाठी गोळीबार होतो ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी स्थानिक गुंड आहेत. मागील कांही दिवसापासुन वरील दोघांच्यासह आणखी काही तरुणांनी उरुळी कांचन गावातील व्यापाऱ्यांच्याकडे खंडणीची मागणी सुरु केली आहे. मात्र खंडणी मागणारे स्थानिक असल्याने, व्यापारी तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करीत आहेत. यामुळे गुंडाची मजल गोळीबार करण्यावर गेली आहे. गोळीबार होऊनही पोलिस यंत्रणा गप्प राहत आहे. कायदा व सुवव्यस्था ढासळली असतानाही, पोलिसांच्यावर कारवाईसाठी उरुळी कांचन व्यापारी संघटना आक्रमक होत नसल्यानेच व्यापाऱ्यांना आजचा बंद पाळावा लागलेला आहे. कायदा व सुवव्यस्था राखण्याच्या ऐवजी लोणी काळभोर पोलिस फक्त उरुळी कांचन व परिसरातील अवैध धंद्याकडुन हप्ते वसुली करण्यावर भर देत आहे. पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत आरोपींना अटक न झाल्यास, मेलच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना आमची समस्या सांगण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.''

बंद नसल्याचा पोलिसांचा दावा....

दरम्यान, उरुळी कांचन येथील व्यापाऱ्यांनी बंद पाळला नसल्याचा दावा लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी केला. याबद्दल बोलताना क्रांतीकुमार पाटील म्हणाले, ''उरुळी कांचन गावातील व्यवहार बंद असले तरी, व्यापाऱ्यांनी बंद पाळलेला नाही. उरुळी कांचन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय कांचन व त्यांच्या सहकाऱ्यांनीही ही बाब पोलिसांनी बोलविलेल्या बैठकीत मान्य केली आहे. मात्र गोळीबाराची घटना गंभीर असल्याने, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके निर्माण केली आहे. येत्या दोन दिवसात आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Traders on strike In Udurali Kanchan