esakal | बारामतीत जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध!
sakal

बोलून बातमी शोधा

Traders strongly oppose Baramati Janata Curfew

.व्यापाऱयांनी 14 दिवसांच्या या जनता कर्फ्यूला विरोध दर्शविल्याने आता व्यापारी या आवाहनाला कितपत प्रतिसाद देणार, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

बारामतीत जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध!

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरात सोमवारपासून (ता. 7) जनता कर्फ्यूचे आवाहन नगराध्यक्षांनी केले असले तरी बारामतीच्या व्यापारी वर्गाने मात्र 14 दिवसांच्या या अघोषित लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शविला आहे. बारामती व्यापारी महासंघ व दि मर्चंटस असोसिएशन या दोन्ही संस्थांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी व्यापाऱयांचे या पूर्वीही सहकार्य होतेच, या पुढेही ते असेलच, पण हा इतका मोठा निर्णय घेताना व्यापाऱयांना अजिबात विश्वासात न घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यापाऱयांनी 14 दिवसांच्या या जनता कर्फ्यूला विरोध दर्शविल्याने आता व्यापारी या आवाहनाला कितपत प्रतिसाद देणार, अशीही चर्चा सुरु झाली आहे. बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी व मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर यांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर यांच्यासह विजय आगम, शाकीर बागवान, सागर चिंचकर यांनीही उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र देत मंदीची लाट विचारात घेता दुकाने बंद ठेवू नयेत व एकतर्फी व अचानकपणे केलेला लॉकडाऊन करु नये, अशी मागणी केली आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या व परिस्थिती गंभीर असल्यामुळे प्रशासनास हा निर्णय घेणे जरूरीचे वाटत असले तरी व्यापारी व प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांसोबत चर्चा होणे गरजेचे होते. कोरोना इतकीच गंभीर आर्थिक परिस्थिती व्यापारी व सामान्य नागरिकांची झालेली आहे. मागील लॉकडाऊन नंतर आत्ता कुठे परिस्थिती थोडी सावरत असताना पुन्हा हा "संपूर्णतः" स्वरुपाचा लॉकडाऊन होऊ घातला आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार
 
''शेतकरी वर्गाचे खरीप हंगामाचे पिक बाजारात येऊ घातले आहे. मूग, बाजरी, मका ही पिके निघालेली असून रोजच पावसाचे सावट असताना ती विकण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने मागे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा मार्केट यार्ड वरील व्यवहार चालू ठेवण्यास परवानगी होती, जी या वेळेच्या बंद मध्ये देण्यात आलेली नाही. यावर चर्चा होणे गरजेचे वाटते आहे, लॉकडाऊनला आमचा विरोध नसुन काही बाबतीत चर्चा करून व्यापारी व शेतकरी वर्गाची अडचण अधिकारी वर्गाने जाणून घ्यावी ही अपेक्षा आहे.''

परस्परविरोधी मते....
''एकीकडे तीन दिवसात तीनशेचा आकडा कोरोना रुग्णांनी पार केल्यावर कडक लॉकडाऊनच्या बाजूने काही नागरिक असताना अनेक जणांनी लॉकडाऊन हा खरचं पर्याय आहे का व त्याने खरचं रुग्णांची संख्या कमी होईल का, असाही सवाल उपस्थित केला आहे. आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असल्याने बंद करु नये अशी व्यापाऱ्यांची भूमिका असताना अनेकांनी मात्र जीव वाचविण्यास प्राधान्य द्या, बाकी सगळे नंतर बघू असे मत मांडले आहे.''