Pune Crime: ट्रेडिंग अन् टास्कच्या आमिषाने फसवणूक; पुण्यातील चौघांना तब्बल ६७ लाखांचा गंडा, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल!

How fake trading apps cheat people in India: सायबर चोरट्यांकडून ट्रेडिंग व टास्कच्या आमिषाने तब्बल ६७ लाखांची लूट; ज्येष्ठ नागरिकांसह चौघांची फसवणूक, विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल
Major Scam in Pune: Trading App and Task Fraud Cheats Four of ₹67 Lakh

Major Scam in Pune: Trading App and Task Fraud Cheats Four of ₹67 Lakh

sakal

Updated on

पुणे: सायबर चोरट्यांनी ट्रेडिंग आणि टास्कचे आमिष दाखवत चौघांना ६७ लाख ५७ हजार १९७ रुपयांचा गंडा घातला. याबाबत सायबर चोरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. कर्वेनगर येथील ६० वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर ट्रेडिंग स्टॉकच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास भाग पाडून १८ लाख ४७ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या कालावधीत घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com