esakal | पुण्यातील भुसार बाजारातील व्यवहार ठप्प | Bhusar Market
sakal

बोलून बातमी शोधा

Bhusar market
पुण्यातील भुसार बाजारातील व्यवहार ठप्प

पुण्यातील भुसार बाजारातील व्यवहार ठप्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर भुसार बाजारात संमिश्र प्रतिसाद होता.

मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला विभागात फळे व भाजीपाल्याची आवकच झाली नाही. अडत्यांनी शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वी बंद असल्याचे कळविले होते, त्यामुळे आवक झाली नाही. परिणामी बंदमध्ये सर्वच घटक सामील झाले होते. भुसार बाजारात बंदला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच काही दुकानांमधील व्यवहार सुरळीत होते तर काही दुकाने बंद होती. अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवत व्यवहार न करता रखडलेली कामे केली.

फुलबाजार सुरळीत

मार्केट यार्डातील फुलबाजारावर बंदचा कसल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. बाजार सुरळीत सुरू होता. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनामुळे मंदिरे बंद होती त्यामुळे फुलबाजारात निरुत्साहाचे वातावरण होते. घटस्थापनेपासून मंदिरे सुरू झाल्याने फुलबाजार गजबजला आहे. बाजार सुरळीत झाल्याने बंद करणे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने फुलबाजार सुरळीत सुरू होता.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षा : ‘बिनधास्त बोला’तून दबलेल्या प्रश्नांना मिळालं व्यासपीठ

फळे, भाजीपाला विभागात हिमाचल प्रदेशातून तीन ते चार दिवसांपूर्वी निघालेल्या सफरचंदाच्या गाड्यांशिवाय इतर आवक झाली नाही एकंदरीत फळे, भाजीपाला विभागात बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे.

- विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन

गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फुलांचे नुकसान झाले. त्यातच गेल्या आठ दिवसांपूर्वी बंद झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी नवरात्र आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजार सुरू ठेवला.

- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन

loading image
go to top