

Research highlights the benefits of traditional Indian food and regular walking in managing Type 2 diabetes.
esakal
पुणे : पारंपरिक भारतीय आहारपद्धती आणि नियमित शारीरिक व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यातील टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी ठरू शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. यामध्ये रुग्णांनी कुटुंबात तयार होणारा पारंपरिक आहारच योग्य प्रमाणात घेतला. दहापैकी सहा रुग्णांमध्ये मधुमेहावरील औषधमुक्त अवस्था साध्य झाली असून, नियमित चालणाऱ्यांमध्ये याचे परिणाम अधिक चांगले दिसले. त्याद्वारे भारतीय पारंपरिक आहारपद्धतीचे व व्यायामाचे महत्त्वदेखील यानिमित्त समोर आले आहे.